औरंगाबाद : तीन वर्षांपासून निसर्गाची अवकृपा आणि त्यामुळे वाढलेला कर्जाचा डोंगर असह्य झाल्याने मंगळवारी मराठवाड्यातील पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. लातूर जिल्ह्यातील तीन व बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एका घटनेने मराठवाडा हादरून गेला.बाळू माधवराव ममालेआत्महत्येचे कारण : कर्ज काढून दोन बोअर घेतले,पाणी लागले नाही़ पुन्हा कर्ज काढून दोन बोअर घेतले, पण तेही बंद पडले. गोविंद तुळशीराम कावळेआत्महत्येचे कारण : व्याजाचा डोंगऱ निसर्गाने यंदाही अवकृपा केल्याने घरातील खर्चाचा व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नव्हता़ त्याच्या पश्चात : पत्नी, दोन मुली़भैरवनाथ वसंत देशमुख आत्महत्येचे कारण : आईच्या नावावर ४ लाखांचे कर्ज. या विवंचनेतून उचलले पाऊल़त्यांच्या पश्चात : आई, पत्नी, बहीण, मुलगी असा परिवार आहे़ बाबासाहेब महादेव भोसले आत्महत्येचे कारण : नापिकी, कर्जाचे ओझे त्यामुळे काही दिवसांपासून निराश होता़त्याच्या पश्चात : आईवडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.भगवान ग्यानदेव निपटे आत्महत्येचे कारण : बँक व खाजगी सावकाराचे कर्ज. हप्ते देणे कठीण बनले. पाऊस कमी झाल्याने उत्पादनातही घट झाली. त्यांच्या पश्चात : पत्नी, दोन मुले़
मराठवाड्यात ५ शेतक-यांची आत्महत्या
By admin | Published: December 03, 2014 4:09 AM