लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राजारामपुरीतील एका रुग्णालयात ५ किलो वजन आणि ६० सेंटिमीटर उंचीचे बाळ जन्मले आहे. विशेष म्हणजे, मोठे बाळ असूनही आईची नैसर्गिक प्रसुती झाली असून बाळ व आई दोघेही सुखरूप आहेत.या महिलेचे हे दुसरे बाळंतपण असून त्या पुण्यात राहतात. माहेर कोल्हापूर आहे. जननी हॉस्पिटलमध्ये डॉ. सरोज शिंदे यांच्याकडे त्या उपचार घेत होत्या. वजन आणि उंची जास्त असलेले हे राज्यातील पहिले बाळ असल्याचा दावा डॉ. शिंदे यांनी केला आहे.यापूर्वी गुजरातमध्ये बडोद्यात ५ किलो ८०० ग्रॅम वजनाचे व महाराष्ट्रात ५ किलो वजनाची बालके जन्मली आहेत. मात्र, बहुतांश बालकांच्या जन्मासाठी मातेचे सिझेरियन करावे लागले आहे.
कोल्हापुरात जन्मले ५ किलोचे बाळ, इतकं वजन आणि उंची असलेले हे राज्यातील पहिले बाळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 4:28 AM