कोल्हापूर : शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणासंदर्भात मार्गदर्शक सूचनांची पूर्तता केल्यासंबंधीचा अहवाल वेळेत सादर केला नाही म्हणून बुधवारी राष्ट्रीय हरित लवादाने कोल्हापूर महानगरपालिका तसेच महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळास प्रत्येकी पाच लाखांचा दंड तसेच महानगरपालिकेला पन्नास लाखांची परफॉर्मन्स गॅरंटी (कामगिरीची हमी) भरण्याचा आदेश दिला. दंडाची तसेच परफॉर्मन्स गॅरंटीची रक्कम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे भरावी लागणार आहे.दिल्लीतील राष्ट्रीय हरित लवादाच्या चार न्यायाधीशांसमोर बुधवारी पुणे येथून व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. त्यावेळी लवादाने ही कारवाई केली. गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीवेळी महानगरपालिका तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लवादाने केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार कामगिरीचा अहवाल मुदतीत सादर केला नव्हता. त्यामुळे लवादाने महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पंधरा दिवसाच्या आत प्रत्येकी पाच लाख रुपये दंड तसेच महापालिका प्रशासनास ५० लाखाची परफॉर्मन्स गॅरंटी भरण्याचे आदेश दिले.रंकाळा तलाव प्रदूषणासंदर्भात महानगरपालिकेच्या विरोधात राष्ट्रीय हरित लवादासमोर येथील कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी खटलादाखल केला आहे. या खटल्यात पंचगंगा नदी प्रदूषणाचा मुद्दाही लवादाने समाविष्ट करून घेतलाआहे
कोल्हापूर पालिकेला ५ लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:41 AM