दिलीप दहेलकर, गडचिरोलीराज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे देण्यात येणाऱ्या भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तब्बल ५ लाख ६ हजार २९१ अर्ज महाविद्यालय व जिल्हास्तरावरील समाजकल्याण कार्यालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित आहेत.राज्यभरात ३६ जिल्ह्यांतील १६ लाख ७१ हजार ७४० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात भारत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीकरिता आॅनलाइन नोंदणी केली. समाजकल्याण विभागाच्या वतीने यापैकी ११ लाख ६५ हजार ४४९ अर्ज मंजूर केले. तर, कागदपत्रांअभावी केवळ ९ हजार ४६८ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज नाकारले आहेत.महाविद्यालय स्तरावर ३ लाख ४ हजार ८७९ व जिल्हास्तरावरील सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात १ लाख ९१ हजार ९४४ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या वेबसाईटवरून मिळाली आहे.
५ लाख शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित
By admin | Published: May 09, 2016 4:08 AM