विधान परिषदेच्या ५ जागा अन् ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 09:38 AM2023-01-17T09:38:19+5:302023-01-17T09:38:42+5:30

२७ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. ३० जानेवारीला होणार मतदान

5 Legislative Council seats and 83 candidates; Final picture clear, result on 2nd February | विधान परिषदेच्या ५ जागा अन् ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल 

विधान परिषदेच्या ५ जागा अन् ८३ उमेदवार; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट, २ फेब्रुवारीला निकाल 

Next

मुंबई : शिंदे फडणवीस आणि महाविकास आघाडीने अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी २७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता एकूण ८३ जण रिंगणात आहेत. 

नाशकात दुहेरी
उद्धव ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष शुभांगी पाटील या मूळ भाजपाच्या असल्यामुळे अखेरच्या क्षणी त्यांचे मन वळविण्यात येईल अशी चर्चा केली जात असताना पाटील यांनी उमेदवारी कायम ठेवली. भाजपाने एबी फॉर्म नाकारलेले व अपक्ष अर्ज दाखल केलेले धनंजय जाधव व धनराज विसपुते या दोघांनीही माघार घेतली. त्यामुळे सत्यजित तांबे व शुभांगी पाटील या अपक्ष उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. 

मराठवाड्यात बहुरंगी
औरंगाबाद : मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे सोमवारी निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आ. विक्रम काळे यांच्यापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. 

नागपुरात तिरंगी 
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माघार घेत ही जागा काँग्रेसला सोडण्यास संमती दिली. शिवसेनेचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांनी अर्ज मागे घेतला. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा देत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. आता अडबाले हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लढतील. अपक्ष उमेदवारी दाखल करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते सतीश इटकेलवार यांनी माघार न घेतल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

अशा रंगणार लढती...

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले - ६
रिंगणातील उमेदवार - १६

प्रमुख लढत - 
१. सत्यजित तांबे (अपक्ष)
२. शुभांगी पाटील (अपक्ष)

मराठवाडा शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले - १
रिंगणातील उमेदवार - १४

प्रमुख लढत - 
१. विक्रम काळे (राष्ट्रवादी काँग्रेस), २. प्रदीप सोळुंके (राष्ट्रवादी बंडखोर), ३. प्रा. किरण पाटील (भाजप), ४. कालिदास माने (वंचित बहुजन आघाडी), ५. सूर्यकांत विश्वासराव (मराठवाडा शिक्षक संघ)

नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले - ५
रिंगणातील उमेदवार - २२

प्रमुख लढत - १. नागो गाणार (शिक्षक परिषद,  भाजप समर्थित), २. राजेंद्र झाडे (शिक्षक भारती), ३. सुधाकर अडबाले (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, मविआ समर्थित)

अमरावती पदवीधर मतदारसंघ
अर्ज मागे घेतले - १०
रिंगणातील उमेदवार - २३

प्रमुख लढत - १. डॉ. रणजित पाटील (भाजप), २. धीरज लिंगाडे (काँग्रेस), ३. अनिल अमलकार (वंचित बहुजन आघाडी), 
४. डॉ. गौरव गवई (बहुजन भारत पार्टी)

कोकण शिक्षक मतदारसंघ
अर्ज मागे घेतले - ५
रिंगणातील उमेदवार - ८

प्रमुख लढत - १. ज्ञानेश्वर म्हात्रे (भाजप), २. बाळाराम पाटील (अपक्ष)

Web Title: 5 Legislative Council seats and 83 candidates; Final picture clear, result on 2nd February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.