ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 23 - सापाच्या अंड्यांना कृत्रिमरित्या उब देवून पिल्ले जन्माला घालण्यात निसर्गमित्रांना यश आले आहे़. बांधकाम करताना सापडलेल्या तस्कर जातीच्या सापाच्या पाचही अंड्यांतून पिल्ले जन्माला आली आहेत़.
शिरपूर येथील नेचर कर्न्झेवेशन फोरममार्फत पक्षी व प्राणी यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केला जातो़. गेल्या दोन महिन्यापूर्वी शहरातील करवंद नाक्याजवळील मुकेशभाई पटेल मेमोरियल हॉलपरिसरात बांधकाम करतांना जवळील रहिवाशांना सापाची पाच अंडी आढळून आली होती़. उत्सुकतेपोटी त्यांनी ही माहिती नेचर कर्न्झर्वेशन फोरमला कळवली़. योगेश वारूडे, यश नेरकर, दीपक पाटील, अक्षय पाटील, अभिजीत पाटील यांनी ती अंडी ताब्यात घेतली़ सदर अंडी तस्कर या सापाची असल्याचे निर्देशनास आले़. अंडी सुस्थितीत आहेत की नाही याची माहिती मिळत नव्हती, तेव्हा त्यांनी कृत्रिमरित्या अंडी उबविण्याचा धाडसी निर्णय घेतला़. सर्व व्यवस्था करून अंडी उबविण्यासाठी ठेवण्यात आली़ तब्बल ५६ दिवसांनी सापाच्या पाचही अंड्यातून पिलांनी जन्म दिला़ केवळ नेचर कर्न्झेवेशन फोरमच्या प्रयत्नांमुळे जन्माला येण्याआधीच मृत्यू निश्चित झालेल्या पिलांना जीवनदान देण्यात आले.
कृत्रीम पध्दतीने अंडी उबवून दुर्मिळ होत चाललेल्या प्राण्यांची संख्या अशाप्रकारे वाढू शकतो़ शास्त्रीय पध्दतीने वातावरणनिर्मिती व तापमान नियंत्रीत केले तर अंड्यातून पिले जन्माला येतात़ अशा नवनवीन पध्दती प्राणी मित्रांच्या अभ्यासाला नवी दिशा देवू शकतात असा विश्वास फोरमचे अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.