शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

५ रुपये ५० पैसे वीज दरवाढ प्रस्तावित, ग्राहकांना बसणार शॉक

By admin | Published: June 14, 2016 7:26 PM

महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाला सादर केला आहे

राजेश निस्ताने,

यवतमाळ, दि. 14 - महसुली तूट वाढत असल्याचे कारण सांगत महाराष्ट्र राज्य वीज महावितरण कंपनीने ५ रुपये ५० पैसे प्रति युनिट वीज दरवाढीचा प्रस्ताव नियामक आयोगाला सादर केला आहे. त्यावर आता प्रत्येक महसूल विभागात जनसुनावणी घेतली जाणार आहे.वीज महावितरणने वीज दरवाढीची प्रस्तावित केलेली याचिका (क्र.४८/२०१६) नियामक आयोगाने १० जून रोजी दाखल करून घेतली आहे. महावितरणने सन २०१६-१७ ते २०१९-२० या काळातील प्रस्तावित दरवाढ सादर केली आहे. त्यासाठी महसुली तूट ५६ हजार ३७२ कोटी रुपयांवर पोहोचणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्राहकांकडून वीज बिलाची सक्तीने वसुली करता येत नाही, दुष्काळामुळे ग्राहक वीज बिल भरत नाही, शासन सार्वजनिक पाणीपुरवठा व अन्य योजनांच्या अनुदानाची रककम तातडीने देत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे मोठ्या प्रमाणात (शासनाने अनुदान न दिल्याने) थकबाकी आहे, अशी कारणे महावितरणने या दरवाढीसाठी सांगितली आहे. कोठूनच पैसा येत नसेल तर महावितरणचा डोलारा चालवायचा कसा असा सवालही महावितरणने विचारला आहे. प्रस्तावित वीज दरवाढीवर आता ११ ते २८ जुलैपर्यंत जनसुनावणी होणार असून अंतिम सुनावणी मुंबईत होत आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये वीज नियामक आयोग आपला निर्णय देईल.महावितरणने दरवाढ प्रस्तावित केली असली तरी आयोग त्यावर काय निर्णय देते यावर महावितरणचे अर्थचक्र अवलंबून आहे. एखादवेळी आयोग ही दरवाढ नाकारण्याची किंवा ५ रुपये ५० पैशाऐवजी अडीच ते तीन रुपये दरवाढ मंजूर करण्याची शक्यता महावितरणच्या गोटात व्यक्त केली जात आहे. कारण गतवर्षी आयोगाने वीज दरवाढ नाकारली होती.आयोगाचे अध्यक्ष ह्यप्रभारीह्णवीज नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी काही महिन्यांपूर्वी अतिरिक्त गृहसचिव चंद्रा अयंगार होत्या. मात्र त्यांच्यानंतर गेली आठ महिने हे पद रिक्त आहे. सध्या अजीज खॉ यांच्याकडे अतिरिक्त प्रभार आहे. या पदावर उच्च न्यायालयाचे निवृत्ती न्यायमूर्ती असावे, अशी ह्यसीएमओह्णची भूमिका आहे. या पदाला अर्धन्यायिक दर्जा असल्याने या पदावरील व्यक्तीला सहजासहजी हटविता येत नाही. ऐन निवडणुकीच्या काळात आयोगाने दरवाढ मंजूर केल्यास युती सरकारची अडचण होण्याची हूरहूर राजकीय स्तरावर आहेच. त्यामुळेच या पदावरील नियुक्तीचा निर्णय अधिक काळजीपूर्वक घेतला जात आहे.उद्योगांच्या दर कपातीचे काय ?राज्यातील उद्योगांच्या वीज दरात किमान १ ते दीड रुपया दर कपात करण्यात यावी, अशी तमाम उद्योजकांची मागणी आहे. उर्जा मंत्री आणि युती सरकार त्यासाठी अनुकूल आहे. उद्योजक दर कपातीची प्रतीक्षा करीत असताना महावितरणने ५ रुपये ५० पैसे ते ६ रुपये ५६ पैसे प्रति युनिट दरवाढ उद्योगांसाठी प्रस्तावित केल्याने दर कपातीचे काय असा प्रश्न उद्योग वर्तुळातून विचारला जात आहे. ही प्रस्तावित दरवाढ पाहता दर कपात करू नका, पण किमान वाढवू तर नका असे म्हणण्याची वेळ उद्योजकांवर आली आहे.निवडणुकीच्या वर्षात केवळ ४ रुपये ४४ पैसे

सन २०१९ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. ग्राहक अर्थात मतदार सरकारवर नाराज होऊ नये, याची खबरदारी महावितरण कंपनीने घेतल्याचे दिसते. कारण निवडणुकीच्या या वर्षात केवळ ४ रुपये ४४ पैसे वीज दरवाढ आयोगाकडे प्रस्तावित करण्यात आली आहे. वीज मंडळाने १ मे २००० पूर्वी केलेल्या आणि वीज नियामक आयोगाने १ मे २००० पासून केलेली सर्वसाधारण सरासरी दरवाढ१ मे १९९२ १८.३९ टक्के१ मे १९९४ ०७.७९ टक्के१ जुलै १९९६ १७.३३ टक्के१ सप्टेंबर १९९८ ०७.०६ टक्के१ मे २००० ०६.५ टक्के१ जानेवारी २००२ ०४ टक्के१ डिसेंबर २००३ ०१.०५ टक्के१ आॅक्टोबर २००६ ०४.०६ टक्के१ मे २००७ ०५.०६ टक्के१ जून २००८ ०६.७६ टक्के१ आॅगस्ट २००९ ०४.२ टक्के१ सप्टेंबर २०१० ०३.०३ टक्के१६ आॅगस्ट २०१२ १६.४८ टक्के२६ जून २०१५ (-५.७५ टक्के)अशी आहे प्रस्तावित दरवाढ (घरगुती ग्राहकांसाठी)

वर्ष रक्कम२०१६-१७ ५ रुपये ५० पैसे२०१७-१८ ९ रुपये ८३ पैसे२०१८-१९ ९ रुपये ८३ पैसे२०१९-२० ४ रुपये ४४ पैसे(औद्योगिक ग्राहकांसाठी)२०१६-१७ ५ रुपये ५० पैसे२०१७-१८ ६ रुपये ५५ पैसे२०१८-१९ ६ रुपये ५६ पैसे२०१९-२० ४ रुपये ४४ पैसेजनसुनावणीचा कार्यक्रम

अमरावती ११ जुलैनागपूर १३ जुलैऔरंगाबाद १८ जुलैपुणे २० जुलैनाशिक २५ जुलैनवी मुंबई २८ जुलैस्थिर आकारही वाढविणार

वीज दरवाढीसोबतच स्थिर आकार वाढविण्याचाही प्रस्ताव आहे. उच्चदाब प्रवर्गातील अर्थात औद्योगिक ग्राहकांना प्रति युनिट ६ रुपये ८६ पैसे तर लघुदाब अर्थात घरगुती ग्राहकांना ५ रुपये ५० पैसे दरवाढीचा प्रस्ताव आहे.० ते १०० युनिट- सध्या ५० रुपये- प्रस्तावित ७५ रुपये१०० ते ३०० युनिट - सध्या ५० रुपये - प्रस्तावित १०० रुपये