मनिषा म्हात्रे, मुंबईप्रसिद्द बांधकाम कंपनी अरिहंत ग्रुपचे जिनेश जैन ( ३०) यांच्यावर बुरखाधारी इसमांनी गोळीबार केला. जखमी झालेल्या जैन यांचा ५ वर्षीय पुतण्या १० मिनिटापूर्वी घटनास्थळी आला होता. त्यामुळे आरोपींनी त्याच्याच अपहरणाचा डाव रचला होता का? या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरु केला आहे . चुनाभट्टी परिसरात राहणाऱ्या रुपराज जैन यांचे नवी मुंबईसह मुंबईत अरिहंत ग्रुप नामे बांधकामाचा व्यवसाय आहे. तसेच चुनाभट्टी परिसरात ज्वेलर्सचे दुकानही आहेत. त्यांना धनेश (४०), जिनेश (३०) आणि मनीष अशी तीन मुले असून तिघेही विवाहीत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास जीनेश यांचा ५ वषार्चा पुतण्या टीटूज खेळता खेळता त्रिमूर्ति सोसायटीमध्ये असलेल्या अरिहंत ग्रुपच्या कार्यालयात आला होता. त्यांचे घर ५ मिनिटांच्या अंतरावर आहे. बाहेरच्या कॅबिन मध्ये जिनेश आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांसोबत बैठक सुरु होती. त्यामुळे टीटूज आतल्या खोलीत कर्मचाऱ्यांसोबत खेळत असताना बाहेरून फायरिंगचा आवाज झाला. ‘मी टीटूजला घेऊन आतमध्येच थांबलो. क्षणभर काय झाले समजले नाही. आम्ही सारेच घाबरलो होतो. साहेबांच्या किंकाळीने आम्हाला धक्का बसला होता. काही वेळाने बाहेर आलो तेव्हा साहेब रक्ताच्या थरोळ्यात पडल्याचे दिसले’, असे तेथे काम करणाऱ्या पदमसिंगने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे हे मारेकारी जिनेश यांच्या पुतण्याचे अपहरण करण्यासाठी तर आले नव्हते ना, या दिशेने तपास सुरु झाला आहे. कारण जिनेश यांचे कुणासोबत वैर नव्हते शिवाय त्यांना कुठल्याही प्रकारचे धमकी अथवा खंडणीचे कॉल आले नसल्याचे जैन कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती एसीपी प्रफुल्ल भोसले यांनी दिली. या परिसरातील क्लीनिक व कोचिंग क्लास त्यावेळी बंद होते. शिवाय परिसरारील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अधिक शोध घेतला जात आहे.
५ वर्षीय चिमुरड्याच्या अपहरणाचा डाव?
By admin | Published: February 06, 2016 3:11 AM