ऑनलाइन लोकमत पेठ, दि. 27 - आदिवासी दुर्गम अशा पेठ तालुक्यातील गढईपाडा येथील वृद्ध, विधवा, शेतमजूर, भूमिहीन अशा पन्नास कुटुंबांना हेमदीप या सामाजिक संस्थेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला मदतीचा हात देत सामाजिक दायित्त्व निभावले आहे.
संस्थेच्या माध्यमातून जमा झालेले किराणा साहित्य गढईपाडा येथील प्रत्येक कुटुंबास तीन किलो गहू, एक किलो तेल, एक किलो दाळ, एक किलो मीठ व अर्था किलो साखर स्नेहभेट देण्यात आली. तर शालेय विद्यार्थांना खाऊचे वाटप करण्यात आले. नवीन वर्षात संस्थेच्या माध्यमातून दुर्गम भागात गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव अनिल बागूल, खजिनदार भूषण येवला, सदस्य प्रशिक सोनवणे, राहुल पिंगळे, निलेश देशमुख, हितेंद्र कोतकर, गौरव सोनवणे , मुख्याध्यापक आर.डी. शिंदे, मोहनदास गायकवाड यांचेसह संस्थेचे सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे ही भावना मनात ठेवून दुर्गम भागातील दुर्बल घटकांपर्यंत आम्ही पोहचू शकलो. दान करण्याचे जे सुख आहे ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवल . यानिमित्ताने गढईपाडा येथील ग्रामस्थ , विद्यार्थी पालक यांच्या सहवासात आम्हाला राहता आले. त्यांच्या चेह-यावरचे हसू सर्व काही सांगून जात होते. - प्रशांत पाटील, अध्यक्ष, हेमदीप सामाजिक संस्था