प्रवीण देसाईकोल्हापूर : शेतीसाठी स्वस्त दरात आणि दिवसाही पुरेशी वीज मिळण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी’ योजनेंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० मेगावॅटचे ‘सौरऊर्जा प्रकल्प’ उभारण्यात येणार आहेत.त्यासाठी ‘महानिर्मिती’कडून १० शासकीय जागांची पाहणी करून प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. सहा महिन्यांत प्रत्यक्षकामाला सुरुवात होईल, असे प्रकल्पाच्या विश्वसनीय सूत्रांकडून सांगितले.सुरुवातीला यात शेतकºयांना सौरपंप देण्याची योजना होती, परंतु हे पंप वितरित करण्याला बºयाच मर्यादा असल्याने, कृषिपंपांना वीजपुरवठा करणाºया ‘महावितरण’च्या सबस्टेशनच्या फिडरनाच सौरऊर्जेच्या माध्यमातून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सबस्टेशन परिसरात सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकºयांना १२ तास वीज मिळू शकणार आहे. सध्या वीजनिर्मितीचा १ युनिटचा दर साधारणपणे साडेसहा रुपये आहे. सौरऊर्जा निर्मितीचा प्रति युनिट खर्च हा साधारणपणे ३ ते ३.२५ रुपये आहे. त्यामुळे निश्चितच शेतकºयांना स्वस्तात वीज मिळणार आहे.
‘कोल्हापूर-सांगली’त ५० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 4:01 AM