नवी दिल्ली : केंद्रीय लाेकसेवा आयाेगाने २०२० मध्ये घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला असून, शुभम कुमार याने प्रथम क्रमांक प्राप्त करून बाजी मारली आहे. तर जागृती अवस्थी आणि अंकिता जैन यांनी दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, शुभम कुमारने आयआयटी मुंबई येथून सिव्हील इंजीनिअरिंगमध्ये बी.टेक. ही पदवी घेतली आहे. लाेकसेवा आयाेगाने निकालासंदर्भात माहिती दिली. मुख्य लेखी परीक्षेनंतर २०२० मध्ये मुलाखती घेण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मृणाली जोशी प्रथम -महाराष्ट्रातून मृणाली जोशी आणि विनायक नरवडे यांनी या यादीत ३६ आणि ३७ वे स्थान पटकाविले आहे. नितीशा जगताप, श्रीकांत माेडक, अनुजा मुसळे, अनिकेत कुळकर्णी, बंकेश पवार, श्रीकांत कुळकर्णी, शरण कांबळे, सायली म्हेत्रे, स्नेहल ढाेके, पूजा कदम, स्वप्निल चाैधरी, विकास पालवे, हर्षल घाेगरे, नीलेश गायकवाड, सायली गायकवाड, हेतल पगारे, सुबाेध मानकर, शिवहर माेरे, सुभ्रमण्य केळकर, सुमितकुमार धाेत्रे, किरण चव्हाण, सुदर्शन साेनावणे, देवव्रत मेश्राम, पीयूष मडके, स्वरूप दीक्षित इत्यादी महाराष्ट्रातील उमेदवारदेखील पुढील नियुक्तीसाठी पात्र ठरले आहेत.