शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दानवेंच्या तोंडाला काळं फासणा-याला 50 हजारांचं बक्षीस - मनसे

By admin | Published: May 12, 2017 11:07 AM

शेतक-यांची अवहेलना करणा-या रावसाहेब दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल", अशी घोषणा मनसेने केली आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 12 -   ‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ असे शेतक-यांचे अवहेलना करणारे वक्तव्य केल्यामुळे  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवर चहुबाजूंनी टीका सुरू आहे.  सर्वच स्तरातून दानवेंवर हल्लाबोल करण्यात येत आहे. यात आता मनसेच्या महिला आघाडीनंही दानवेंवर टीका करत, "दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल", अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीनं केली आहे.  
 
"शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल", अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे.
 
"दानवेंच्या तोंडातून येणारी वाक्य ही सत्ताधाऱ्यांना आलेला माज असून रावसाहेब दानवेंची तात्काळ प्रदेश अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात यावी. अन्यथा नवी मुंबईत रावसाहेब दानवेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही.", असा इशाराही नवी मुंबई महिला सेना उपशहर अध्यक्ष आरती धुमाळ यांनी दिला आहे.
 
(कानउघाडणीनंतर दानवेंची दिलगिरी)
‘तूर खरेदी केली तरी रडतात साले’ या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष  रावसाहेब दानवे यांची भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी चांगलीच कानउघाडणी केल्यानंतर दानवे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. तो (‘साले’) शब्द आपण शेतकऱ्यांना उद्देशून म्हटलेला नव्हता, असे स्पष्टीकरणही त्यांनी केला. दानवेंच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद गुरुवारी राज्यभरात उमटले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचेही कार्यकर्ते दानवेंच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले.
 
सूत्रांनी सांगितले की, दानवेंचे वक्तव्य देशभरातील वृत्तपत्रे आणि चॅनेल्सनी ते दाखवल्यानंतर त्याची गंभीर दखल भाजपाच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी घेतली आणि दानवेंना दिलगिरीचे पत्रक काढण्यास सांगण्यात आले. दानवेंनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून खुलासा केला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीही त्यांना दिलगिरी व्यक्त करण्याची सूचना केली. त्यानंतर दुपारीच त्यांचा ‘दिलगिरीनामा’ जारी करण्यात आला.
 
या दिलगिरीनाम्यात दानवे यांनी म्हटले आहे की, भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जालना येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये ग्रामीण भागात जाऊन शेतक-यांशी संवाद साधणे व तो शेतात जाऊन साधणे, अशा प्रकारची चर्चा झाली. परंतु एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि केंद्र सरकारने पुन्हा एक लाख टन तूर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे मी कार्यकर्त्यांना समजावून सांगितले. अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही. मी स्वत: शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत 35 वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे दानवे यांनी म्हटले आहे.
 
दानवेच राहू द्या - पवार
रावसाहेब दानवे भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राहणे हे विरोधकांच्या फायद्याचे आहे. उगाच त्यांच्यावर कारवाईची मागणी कशाला करता? असा मार्मिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लगावला.