शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

फसवेगिरी ५०० कोटींची

By admin | Published: October 23, 2016 1:28 AM

ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील कॉल सेंटरची जगभरात विशेषत: अमेरिकेत सध्या जास्त चर्चा आहे. निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्याची दखल घ्यावी लागली.

- जितेंद्र कालेकर ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील कॉल सेंटरची जगभरात विशेषत: अमेरिकेत सध्या जास्त चर्चा आहे. निवडणुकीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनाही त्याची दखल घ्यावी लागली. या चर्चेचे कारणही तसेच आहे. या कॉलसेंटरमधून थेट अमेरिकन नागरिकांना करोडो रुपयांना गंडा घालण्यात आला. या फसवणुकीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावला. नेमके काय आहे हे प्रकरण याचा घेतलेला हा आढावा.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील कॉल सेंटर हे अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे मुख्यालय असल्याचे भासवून तिथून थेट अमेरिकन नागरिकांशी भामटेगिरीने संवाद साधून त्यांना करोडो रुपयांना गंडा घालण्यात आला. या फसवणुकीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावून, एकाच वेळी सात कॉल सेंटरवर धाडी टाकल्या. या धाडीत कॉलसेंटर चालक मालकांसह आतापर्यंत ७४ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ७२ जणांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. अजूनही ६२६ जण संशयाच्या भोवऱ्यात असल्याने, त्यांना नोटीस बजावलेली आहे. या फसवणूक प्रकरणी अमेरिकन एफबीआय (फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन) या गुप्तचर संस्थेने ठाणे पोलिसांशी संपर्क साधला असून, भारतीय गुप्तचर यंत्रणांचेही या फसवणुकीकडे लक्ष वेधले आहे. ठकसेनांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर अमेरिकन नागरिकांचीही करोडो रुपयांची फसवणूक केल्याने पोलीसही चक्रावले आहेत. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०० रु पयांची रक्कम उकळल्याचे ७२ पैकी चौघांच्या चौकशीत उघड झाले आहे.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथील कॉल सेंटर हे अमेरिकन इंटरनल रेव्हेन्यू सर्व्हिसेसचे मुख्यालय असल्याचे भासवून, तिथून थेट अमेरिकन नागरिकांशी भामटेगिरीने संवाद साधून त्यांना करोडो रुपयांना गंडा घालण्यात आला. या फसवणुकीचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने छडा लावून एकाच वेळी सात कॉल सेंटरवर धाडी टाकल्या. या धाडीत कॉलसेंटर चालक मालकांसह आतापर्यंत ७४ जणांना अटक करण्यात आली आहे, तर ७२ जणांना चौकशीनंतर सोडण्यात आले आहे. अजूनही ६२६ जण संशयाच्या भोवऱ्यात असल्याने त्यांना नोटीस बजावलेली आहे. या फसवणूक प्रकरणी अमेरिकन एफबीआय (फेडरल ब्युरो आॅफ इनव्हेस्टिगेशन) या गुप्तचर संस्थेने ठाणे पोलिसांशी संपर्क साधला असून, भारतीय गुप्तचर यंत्रणांचेही या फसवणुकीकडे लक्ष वेधले आहे. ठकसेनांनी तंत्रज्ञानाच्या जोरावर अमेरिकन नागरिकांचीही करोडो रुपयांची फसवणूक केल्याने पोलीसही चक्रावले आहेत. व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून, त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०० रु पयांची रक्कम उकळल्याचे ७२ पैकी चौघांच्या चौकशीत उघड झाले आहे.अशी लढविली जायची शक्कल....मी अमेरिकन आयआरएस विभागातून बोलत असून, तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो, असे सुरुवातीला सांगणारा कॉल सेंटरचा भामटा नंतर भाषा कडक करायचा. प्राथमिक चौकशीत तुम्ही आयआरएसच्या संशयाच्या भोवऱ्यात असून, तुमच्याविरुद्ध कायदेशीर खटला भरल्याचे सांगितले जायचे. मग केस क्रमांकही सांगितला जायचा. त्यानंतर, खटल्याचा तपशील सांगितला जाई. यात तीन गंभीर आरोप संबंधितांवर होते. पहिला कर कायद्याचा भंग, दुसरा सरकारला चुकीची माहिती देणे आणि तिसरा कर चुकवेगिरीतून चोरी. आयआरएसच्या नोंदीनुसार तुमच्या ज्ञात उत्पन्नात तफावत आहे. हे सर्व हेतूत: केल्याचे उघड झाले आहे, असेही हा कॉल करणारा सांगायचा. त्यामुळे पुढच्या ३० मिनिटांमध्ये आयआरएसचा अधिकारी स्थानिक पोलिसांसमवेत तुमच्याकडे रेड टाकेल. या प्रकरणात तुम्हाला तीन वर्षांचा कारावासही होऊ शकतो. हा खटला कोणत्याही कर सल्लागारामार्फत तुम्हाला सोडविता येणार नाही. तुमचा पेमेंट प्लानही आता संपलेला आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला अटक वॉरन्ट काढले जाणार आहे. त्यानंतर, पुन्हा संबंधितांवर थोडीशी सहानुभूती दाखवित, काही प्रश्नावली केली जायची. तुमच्याविरुद्ध कोणता खटला प्रलंबित आहे का? वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल काही दंड झाला आहे का? बँक अपहारात तुम्ही अडकला आहात का? ही सर्व नकारात्मक उत्तरे मिळाल्यानंतर, तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरे दिल्याचे आढळल्याचे सांगितले जायचे. पुन्हा एका अधिकाऱ्याशी बोलणे व्हायचे. त्यानंतर, फोन होल्डवर ठेवत तुम्हाला दोनच पर्याय एक तर कायदेशीर लढाई किंवा तडजोड करणे. त्यानंतर, तडजोडीवर भर दिला जात असे. टॅक्सच्या दंडापोटी मोठी रक्कम सांगितली जाऊन, त्यानंतर आयआरएसच्या गंभीर कायद्याची माहिती सांगून पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे धमकी दिली जायची. यात चालक परवाना रद्द करणे, बँक खाते गोठविणे, कामगार कायद्यानुसार कारवाई करून सात वर्षांचा कारावास, पासपोर्ट रद्द करण्याची धमकी... इतके सगळे ऐकल्यानंतर, अमेरिकन नागरिक तडजोडीला नाईलाजास्तव तयार होई. मग त्याला गिफ्ट कार्ड खरेदी करण्याचा सल्ला दिला जाई. ते खरेदी करताच, त्याला त्यावरील क्रमांक विचारून ते भारतातील कॉल सेंटरच्या संचालकांच्या व्हॉट्सअ‍ॅपर टाकले जायचे. त्याचे १५ आकडे संबंधित कॉल घेणाऱ्याकडून विचारले जायचे. ते दिल्यानंतर, त्याद्वारे पैसे घेण्यात येत होते. यात साधारण २० टक्के रक्कम कमिशन पोटी गिफ्ट कार्ड विकणाऱ्याला, तर ८० टक्के रक्कम ही भारतातून फोन करणाऱ्याला मिळायची, तसेच बँक अकाउंटची माहिती मिळवून पैसे लंपास करीत असत. लोकांच्या अकाउंटवरून आॅनलाइन शॉपिंगही केली जात होती. अशी झाली कारवाई मीरा रोड येथील काही बनावट कॉल सेंटरमधून तोतयागिरीने अमेरिकन नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानंतर, राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे या ठिकाणी धाडसत्र राबविले. पोलीस उपायुक्त पराग मणोरे, सहायक आयुक्त मुकुंद हातोटे, भरत शेळके आणि निरीक्षक नितीन ठाकरे, तसेच काशीमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सानप आदींच्या पथकाने ४ आॅक्टोंबर रोजी रात्रभर मीरा रोड येथील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्क, बाले हाउस, युनिवर्सल आउट सोर्सिंग सर्व्हिस आणि ओसवाल हाउस अशा तीन इमारतींमधील सात कॉल सेंटरवर छापे टाकले. ४० अधिकाऱ्यांसह २०० पोलिसांच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल ७७२ जणांना ताब्यात घेतले होते. शॅगी पसार...या प्रकरणातला महत्त्वपूर्ण आरोपी आणि सूत्रधारांपैकी एक सागर ठक्कर उर्फ शॅगी हा मूळचा अहमदाबादचा आहे. त्याने तिथूनच याची सूत्रे हालविली होती. तो परदेशात पसार झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या प्रकरणी अटक केलेल्या जगदीश कनानी याचीही कसून चौकशी करण्यात येत आहे. तोही यातील एक मास्टरमाइंड आहे. त्याने कॉलसेंटरमध्ये अनेकांना प्रशिक्षण दिले आहे.अमेरिकेत भारताची बदनामी : भारतातून दिवसागणिक असे अनेक कॉल येत असल्यामुळे, अमेरिकेतल्या काहींना अशा कॉल्सची सवय झाली होती, तर काही चलाख अमेरिकन्सनी नायझेरियन्स फ्रॉड करणाऱ्यांप्रमाणे ‘इंडियन फ्रॉड कॉलर’चे फोन आल्यानंतर, ते लगेचच ओळखण्याचे तंत्र अवगत केले. असे फोन करणाऱ्यांची भाषा, शब्द उच्चारण्याची लकब, यावरून हे कॉल भारतातूनच येत असल्याचे ताडले जात होते. असे कॉल येताच, त्यांना ते ‘यू फ्रॉड इंडियन’, ‘ डोन्ट कॉल मी अगेन’ अशा भाषेतच दोन शब्द सुनावले जात होते.हवालातून दीड कोटीचा व्यवहार : हैदरअली अयुब मन्सुरी याच्याकडून एक इकोस्पोर्ट फोर्ड ही कार जप्त केली. कॉल सेंटरमधील फसवणुकीच्या पैशांतून मीरा रोड ते अहमदाबाद-अमेरिका आणि अहमदाबाद असे हवाला मार्गाने सुमारे दीड कोटीचे व्यवहार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे.करोडोंची फसवणूक : मीरा रोड येथील कॉल सेंटरवरून साधारण साडेसहा ते सात हजार परदेशी नागरिकांची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. प्रत्यक्षात हा आकडा काही लाखांमध्ये असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.