मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि रिस्पॉन्सिबल नेटिझम यांच्या संयुक्त विद्यमाने 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्यभरातील दहा शहरांमधील पाच हजार महाविद्यालयीन तरूणींना वेबिनारच्या माध्यमातून सायबर सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते मंगळवार, २१ जुलै रोजी या प्राशिक्षण कार्यक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे. मोबाईल, इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबतच महिलांविरोधातील सायबर गुन्हे, फसवणूक यातही वाढ होत आहे. मुलींना सायबर विश्वातील सुरक्षित वापर आणि वावर याकरिता प्रशिक्षित करण्यासाठी 'डिजीटल स्त्री शक्ती' उपक्रम सुरु होत आहे. १६ ते २५ वयोगटातील महाविद्यालयीन तरुणींना इंटरनेटचा सुरक्षित उपयोग, गैरप्रकार झाल्यास कायदेशीर बाबी, मानसिक परिणाम, तांत्रिक फसवणूक आदीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल.
१०० वेबिनार मधून राज्याच्या दहा शहरातील पाच हजार तरुणींना ‘सायबर सखी’ म्हणून प्रशिक्षित करण्यात येईल. शुभारंभाचा वेबिनार मंगळवारी, २१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता होणार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या भाषणाने होणार आहे. घन:श्यामदास सराफ महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीसाठी आयोजित वेबिनारमधे सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांसह मुंबई पोलिस सायबर शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर ही उपस्थित राहणार आहेत.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह
दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...