शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी मध्यरात्री घेतली जरांगेंची भेट
2
सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
3
डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...
4
अक्षय शिंदेचा मृत्यू नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
5
धक्कादायक! घरमालकाने UPSC ची तयारी करणाऱ्या महिलेचा बनवला अश्लील Video, असा झाला खुलासा
6
स्मिथचा एकदम परफेक्ट पुल शॉट! पण Brydon Carse च्या अप्रतिम झेलमुळं खेळच खल्लास (VIDEO)
7
'तुमची मंजू माई 'ऑस्कर'पर्यंत पोहचली...', 'लापता लेडीज' फेम छाया कदम यांची खास पोस्ट
8
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
9
ENG vs AUS : इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला; यजमानांना घाम फुटला पण कर्णधाराने बदला घेतला
10
Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव
11
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
12
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
13
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
14
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
15
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
16
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
17
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
18
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
20
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या

वर्षभरात रुग्णवाहिकेत साडेपाच हजार बाळांचा जन्म

By admin | Published: December 29, 2015 2:00 AM

‘डायल १0८’ सेवा ; महिलांची प्रसुती झाली सुलभ.

नीलेश शहाकार/ बुलडाणा : ह्यडायल १0८ह्ण या सरकारी सेवेमुळे वर्षभरात तब्बल ५ हजार ८५१ बालकांचा रुग्णवाहिकेत जन्म झाला. विशेष म्हणजे सरकारी आरोग्य सेवेमुळे ग्रामीण व दुर्गम भागात महिलांची प्रसुती सुलभ झाली.आरोग्य विभागाने डिसेंबरमध्ये तयार केलेल्या अहवालात जानेवारीपासून २८ नोव्हेंबरपर्यंंतची आकडेवारी उपलब्ध करून दिली आहे. वेळेवर उपचार मिळू न शकल्याने माता व नवजात अर्भकाचा मृत्यू होण्याचे प्रकार घडतात. माता-बालमृत्यू रोखण्यासाठी २६ जानेवारी २0१४ पासून राज्य शासनाकडून महाराष्ट्र इर्मजन्सी मेडिकल सर्व्हिसेस अंतर्गत ह्यडायल १0८ह्ण रुग्णवाहिका सेवा सुरू झाली.१0८ क्रमांक डायल केल्यानंतर सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह उपरोक्त ठिकाणी येते. गर्भवती महिलेवर तत्काळ उपचार करून वेळप्रसंगी रुग्णवाहिकेत प्रसुतीही केली जाते. राज्यात अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज ९३७ रुग्णवाहिका आहेत. त्यात २३३ ह्यअँडव्हान्स लाईफ सपोर्टह्ण आणि ७0४ ह्यबेसिक लाईफ सपोर्टह्ण रुग्णवाहिका आहेत. गर्भवती महिलासांठी या रुग्णवाहिका वरदानच ठरल्या आहेत.विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये एक हजार १३0 तर अहमदनगर २६२, औरंगाबाद ३२0, बीड ३३२, धुळे ११२, हिंगोली १४३, जळगांव १३५, जालना १४२, कोल्हापूर १६६, लातूर २३३, मुंबई ६0, नांदेड २0५, नंदूरबार १४0, नाशिक ३३७, उस्मानाबाद १७५, परभणी १३७, पुणे ३८५, रायगड ५८, रत्नागिरी ४८, सांगली १३९, सातारा २६४, सिंधुदुर्ग १९, सोलापूर ३६७, ठाणे १७५ तर पालघर जिल्ह्यात १६६ बाळांचा रुग्णवाहिकांत जन्म झाला.