नवी दिल्ली: राज्यातील 51 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गौरव करण्यात येणार आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावं स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील आठ पोलीस कर्मचारी-अधिकाऱ्यांना शौर्य पदकं जाहीर झाली आहेत. तर तीन कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं गौरव करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं तयार केलेल्या यादीत देशभरातील 942 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.राज्यातील एकूण 51 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा पोलीस पदकांनी सन्मान करण्यात येणार आहे. राज्यातील केंद्रीय राखीव पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांनाही पोलीस पदकं जाहीर झाली आहेत. यामध्ये मुंबईतील राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राधेशाम पांडे आणि नागपूरचे उपनिरीक्षक सुरेश कुमार थापा यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालेले अधिकारीशिवाजी तुळशीराम बोडखे, सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहरबाळू प्रभाकर भवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नियंत्रण कक्ष, नाशिक शहरदयानंद हरिश्चंद्र ढोमे, पोलीस निरीक्षक, चतुश्रृंगी पोलीस स्टेशन, पुणे शहरशौर्य पदक जाहीर झालेले अधिकारी-कर्मचारीशितलकुमार अनिक कुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षकहर्षद बबन काळे, पोलीस उपनिरीक्षकप्रभाकर रंगाजी मडावी, पोलीस कॉन्स्टेबलमहेश दत्तू जाकेवार, पोलीस कॉन्स्टेबलअजितकुमार भगवान पाटील, पोलीस उपनिरीक्षकटिकाराम संपतराय काटेंगे, नायब पोलीस कॉन्स्टेबलराजेंद्र श्रीराम तडमी, पोलीस कॉन्स्टेबलॉसोमनाथ श्रीमंत पवार, पोलीस कॉन्स्टेबल
राज्यातील 51 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पोलीस पदकं जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 9:58 PM