सोलापूर : शासनाने राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ५१६ कोटी ३० लाखांच्या कर्जाला हमी दिली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक कारखाना चालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात काम करूनही शरद पवार यांनी ही मदत दिली आहे. याचा आगामी राजकारणावर परिणाम होणार, अशी चर्चा रंगली आहे.
शासनाने हमी दिलेल्या साखर कारखान्यांचा यादी.( आकडे कोटीत.) म़ शं़ कोल्हे कारखाना (कोपरगाव, अहमदनगर)-१८़२२, कुकडी कारखाना (पिंपळगाव, अहमदनगर)- १८, वृद्धेश्वर कारखाना (आदिनाथनगर, अहमदनगर)- १०़ ८७, डॉ़ वि़ वि़ पाटील (प्रवरा नगर)- २३़८४, सुंदरराव सोळुंके (धारुर, बीड)- १९़३२, रेणुकादेवी शरद (पैठण, औरंगाबाद) - ४़७५, वैद्यनाथ कारखाना (परळी, बीड)- १६़५६, जयभवानी कारखाना (गेवराई, बीड)-९़७२, मोहनराव शिंदे कारखाना (आरग, सांगली) - १८़२६, कुंभी-कासारी (करवीर, कोल्हापूर) - २६़३०, डॉ़ ना़ ना़ हु़ किसन अहिर (वाळवा, सांगली) - १८़१३, भाऊराव चव्हाण (अर्धापूर, नांदेड) - १५़८१, भाऊराव कारखाना (हिंगोली) - ८़५१, टोकाई कारखाना (वसमत, हिंगोली) - ५़३९, विघ्नहर कारखाना (पुणे) - २४, रावसाहेब पवार घोडगंगा (शिरुर, पुणे) - २०़२७, छत्रपती कारखाना (भवानीनगर, पुणे) - २८़४२, नीराभीमा कारखाना (इंदापूर, पुणे) - १५़४०, राजगड कारखाना (भोर, पुणे) - १०, किसनवीर खंडाळा (खंडाळा, सातारा) - ११़६०, किसनवीर सातारा कारखाना (वाई, सातारा) - १८़९८, विठ्ठल साई कारखाना (उमरगा, उस्मानाबाद) - १०़ ८५, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर कारखाना (केशेगाव, उस्मानाबाद) - २२़०८, रामेश्वर कारखाना (जालना) - ९़३३, अंबाजोगाई कारखाना (अंबाजोगाई, बीड) - ९़७२, मारुती महाराज (औसा, लातूर) - ७, विठ्ठल कारखाना (गुरसाळे, पंढरपूर) - ३०़९६, दामाजी कारखाना (मंगळवेढा) - १०़५८, शंकरराव मोहिते-पाटील (अकलूज) - ३३़२४, संत कूर्मदास (माढा) - ५़१५, भीमा साखर कारखाना (मोहोळ) - २०़२२, वसंतराव काळे कारखाना (पंढरपूर) - १४़५२