राजू काळे / भार्इंदरआजाराचे वेळीच योग्य निदान झाले नाही तर संपूर्ण आयुष्यभर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा वेदनादायी अनुभव वसईतील मेरी पीटर (६४) यांना आला. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या उजव्या पायाला एक छोटीशी जखम झाली. मात्र त्यावर परिणामकारक उपचार न झाल्याने त्या जखमेतून सतत रक्तमिश्रित स्राव होत होता. अनेकदा उपचार करुनही ती जखम बरी होत नव्हती. अखेर मीरारोड येथील खासगी इस्पितळात अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. निखिल अग्रवाल यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि मेरी यांची भळभळती जखम बरी झाली. गेल्या ५२ वर्षांत तब्बल १०० हून अधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. परंतु त्यांची जखम बरी झाली नाही. ६२ वर्षांच्या मेरी यांना हा आजार कमालीचा त्रासदायक ठरु लागला. त्यांच्या सततच्या आजाराला व शस्त्रक्रियांना कुटुंबही कंटाळले होते. त्यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी मीरारोड येथील एक खासगी रुग्णालयातील अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. अग्रवाल यांची भेट घेऊन त्यांना आपल्या आईच्या आजाराची माहिती दिली. मेरी यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. तसेच रक्ताचे नमुने तपासण्यात आले. मेरी यांच्या उजव्या मांडीच्या हाडांमध्ये जंतुसंसर्ग झाल्याचे निदान झाले. डॉ. अग्रवाल यांनी मेरी यांच्या पायावर तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.शस्त्रक्रियेद्वारे त्यांच्या मांडीच्या हाडामध्ये ‘अँटीबॉयोटिक लेन्ड सिमेंट रॉड’ बसवण्यात आला. त्यांच्या पायातून होणारा रक्तस्राव थांबल्यानंतर त्यांच्या मांडीत बसवण्यात आलेला रॉड अलीकडेच काढण्यात आला. मेरी यांच्या पायाची जखम पूर्णपणे बरी झाल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.
तब्बल ५२ वर्षांनंतर बरी झाली जखम
By admin | Published: April 26, 2017 1:53 AM