केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यानं दिवाळीआधी विजयाचे फटाके कोण फोडतो आणि कुणाचे फटाके फुसके ठरतात, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांपैकी 54 जागांवर आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे या 54 मतदारसंघात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडणुकांच्या रिंगणात उभारतील. त्यामध्ये 29 जागा अनुसूचित जातींसाठी तर 25 जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित आहेत. त्यामुळे 54 मतदारसंघातील उमेदवार हे आरक्षणाचा आधार घेत निवडणूक लढवणार आहेत.
SC, ST साठी महाराष्ट्रातील राखीव मतदारसंघ
SCभुसावळमेहकरमूर्तिजापूरवाशिमदर्यापूरउमरेडनागपूर उत्तरभंडाराअर्जुनी मोरगावचंद्रपूरउमरखेडदेगलूरबदनापूरऔरंगाबाद पश्चिमदेवळालीअंबरनाथकुर्लाधारावीपिंपरीपुणे कॅन्टोन्मेंटश्रीरामपूरकेजउदगीरउमरगामोहोळमाळशिरसफलटणहातकणंगलेमिरज
STअक्कलकुवाशहादानंदुरबारनवापूरसाक्रीशिरपूरचोपडामेळघाटअमगावआरमोरीगडचिरोलीअहेरीराळेगावअर्णीबागलाणकळवणदिंडोरीइगतपुरीडहाणूविक्रमगडपालघरबोईसरभिवंडी ग्रामीणशहापूरअकोले (जि. अहमदनगर)