शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

राज्यातल्या ५४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 6:00 PM

महाराष्ट्रातल्या ५४ पोलीस पोलिसांचा गौरव होणार

मुंबई: राज्यातल्या ५४ पोलिसांचा राष्ट्रपती पोलीस पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं या पोलिसांची यादी जाहीर केली आहे. देशातल्या १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झालं आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या ५४ जणांचा समावेश आहे. यापैकी १० पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक तर ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झालं आहे.अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा. पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक) या चार अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झालं आहे. तर मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे या पोलिसांचा शौर्य पदकानं सन्मान करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यातल्या ४० पोलिसांना गुणवत्ता सेवा पदकानं गौरवण्यात येईल.  प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयानं राष्ट्रपती पोलीस पदक, जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरी सेवा दल पदकांची घोषणा केली. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी पोलिसांना दिल्या जाणाऱ्या शौर्य पदक, विशिष्ट सेवा पदक व गुणवत्ता सेवा पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशातल्या १०४० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान होणार आहे. यापैकी ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं गौरवलं जाईल. तर २८६ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, ९३ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक आणि ६५७ पोलिसांना गुणवत्ता सेवा पदकानं सन्मानित केलं जाईल.