ऑनलाइन लोकमत -
अहेरी, दि. 16 - गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची बोरी येथून तेलंगणा राज्यात कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या दोन ट्रक सह ५५ बैल अहेरी पोलिसांनी जप्त केले. अहेरीचे पोलिस उपनिरीक्षक नीलेश सोळंके,रमेश दलाई व बजरंग दल कार्यकर्ते यांना आयशर ट्रक मधून बैल व इतर जनावारांची कत्तलिसाठी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे रात्री ११ वाजता नागेपल्ली येथे सापळा रचुन TC--05 B 4834 आणी TC 05 UB 7579 क्रमांकाचे आयशर ट्रकची पाहणी केली असता त्यात बैल कोंबून असल्याचे दिसले. तात्काळ दोन्ही ट्रकच्या चालक व क्लीनरला ताब्यात घेण्यात आले. मात्र मुख्य सूत्रधार फरार झाला.
हाटे ५ वाजे पर्यंत या ट्रक मधून ५५ बैलांची सुटका करुन नागेपल्ली येथील कांजी येथे सुरक्षित ठेवण्यात आले. सकाळी याबाबत अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नरसिम्हा रमावंत , देवराज तरपूरी,गोपी मुलगुरी आणी मधु असे चार आरोपींना अटक केली.
अहेरी कोर्टाने सर्व आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर मोहम्मद नावाचा इसम फरार झाला. बैलांना कोंबून ठेवल्याने पायात शक्ती उरली नव्हती. बैलांना उचलून कांजी मधे ठेवण्यात आले.
वाहतुकीसाठी नवीन शक्कल
सिरोंचा जवळील गोदावरी नदीवरील पुल झाल्याने सिरोंचा मार्गे कत्तलिसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. रात्रीच्या वेळेस सुरक्षेच्या कारणाने पोलिस विभाग गस्त घालू शकत नाही याचा फायदा वाहनधारक उचलतात. जनवारांची वाहतूक करण्यासाठी विशेष पद्धतीने हे वाहन डबल डेकर पद्धतीने तयार केले असून एकाच वेळी ३० ते ४० जनावर एका वाहनात कोंबण्याची व्यवस्था होऊ शकते.