पुणे : राज्य शासनाच्या आमदार आदर्श ग्राम योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून प्रत्येकी ५५ लाख रुपयांचा निधी देण्यासंदर्भांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी आमदारांना सांगितले. आमदार आदर्श गाव योजनेसाठी सोमवारी पहिलीच आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी २५ आमदारांपैकी केवळ १३ आमदार उपस्थित होते.केंद्र शासनाच्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर राज्यात आमदार आदर्श ग्राम योजना सुरु करण्या आली आहे. प्रत्येक आमदाराने आपल्या मतदार संघात किमान एक गावाची निवड करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या. त्यानुसार २१ विधानसभा आमदार व ४ विधान परिषदेच्या आमदारांनी एका गावाची निवड केली आहे. या योजनेला गती देण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये येत्या ८ मार्च रोजी गावांमध्ये महिला दिना निमित्त विशेष ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. या ग्राम सभामध्ये चर्चा करून गावाचा विकास आराखडा तयार करण्याच्या सचूना देण्यात आल्या आहेत. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप, उप जिल्हाधिकारी रामदास जगताप, आमदार दत्तात्रये भरणे, राहुल कुल,माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, विजय काळे, जयदेव गायकवाड, शरद सोनवणे, बाबूराव पाचर्णे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदार आदर्श ग्रामसाठी ५५ लाख
By admin | Published: March 01, 2016 1:21 AM