मुंबई : अनेकदा गर्भधारणेदरम्यान मातेकडून मिळणाऱ्या हार्मोन्सचा दुष्परिणाम पोटात वाढणाºया जिवावर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चुकीच्या हार्मोन्सच्या सेवनामुळे बाळाच्या लिंगावर थेट परिणाम होतो. परिणामी, स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही लिंग असलेले बाळ जन्माला येते. यालाच वैद्यकीय भाषेत ‘इंटरसेक्स’ असे म्हणतात. गेल्या सात वर्षांत पालिका रुग्णालयांत ५६ नवजात बालके इंटरसेक्स जन्माला आल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.नायर रुग्णालयात सात वर्षांत स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही लिंग असलेल्या २८ नवजात बाळांचा जन्म झाला. यानुसार, २०११-१२ या वर्षात तीन, २०१२-१३ मध्ये चार, २०१३-१४ मध्ये तीन, २०१४-१५ मध्ये तीन, २०१५-१६ मध्ये पाच, २०१६-१७ मध्ये चार आणि २०१७-१८ या वर्षात तब्बल सहा मध्यलिंगी मुले जन्माला आली. केईएम रुग्णालयातही सात वर्षांत २८ नवजात बालके मध्यलिंगी जन्माला आली, तर शीव रुग्णालयात गेल्या पाच वर्षांत जवळपास ३ ते ४ मध्यलिंगी बाळांचा जन्म झाला आहे.आनुवंशिक किंवा गर्भधारणा झाल्यानंतर महिलेच्या शरीरात होणारे बदल, महिलेच्या शरीरात स्टेस्टोरॉन हार्मोन तयार होताना झालेले बदल, आईच्या शरीरात पुरुषांचे हार्मोन्स तयार करणारा ट्यूमर अशी बरीच कारणे असतात, असे जे. जे. रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अशोक आनंद यांनी सांगितले.वातावरणातील प्रदूषण हेही कारणइंटरसेक्स बाळांना दोन लिंग असतात. स्त्री आणि पुरुष असे दोन्ही अवयव घेऊन जन्माला येणे, यामागील आनुवंशिकता आणि वातावरणातील प्रदूषण ही मुख्य कारणे आहेत. त्याचप्रमाणे, महिलेच्या शरीरात स्टेस्टोरॉन हार्मोन तयार होताना झालेले बदल, यामुळेही मध्यलिंगी बाळ जन्माला येऊ शकते. अशा प्रकरणात पालकांचे समुपदेशन करणे हा मुख्य भाग असतो. अनेकदा समजूत घालूनही पालकांमध्ये गैरसमज असतो. याकरिता मध्यलिंगी बाळांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. शिवाय, प्रत्येक प्रकरण हे वेगवेगळे असते, त्यामुळे अडचणी पाहून डॉक्टरांना काम करावे लागते, असेही त्यांनी नमूद केले.
गेल्या सात वर्षांत जन्मली ५६ ‘इंटरसेक्स’ बालके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 7:16 AM