ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - अखंड महाराष्ट्राचा नारा देत शिवसेनेसह विरोधी आमदारांनी सोमवारी विधिमंडळ गाजवले. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही वेगळ्या विदर्भाबाबत कोणताही प्रस्ताव शासनाकडे नसल्याची स्पष्टोक्ती दिली. वेगळ्या विदर्भाबाबत काही दिवसांपूर्वी आॅनलाइन लोकमतने पोल घेतला होता. या पाेलला वाचकांनीही प्रतिकूल कौल दिला होता.
यामध्ये स्वतंत्र विदर्भ हवा का? आर्थिक विकास, राजकीय प्रभाव इत्यादी गोष्टींचा प्रभाव आहे का? अशा विविध अंगांनी पाहणी करण्यात आली. या पोलमध्ये तब्बल सात हजारांपेक्षा वाचकांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 56.7 टक्के सहभागींनी स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात कौल दिला. विशेष म्हणजे, या पोलमध्ये जवळपास 40 टक्के सहभागी विदर्भातले होते, तर 60 टक्के सहभागी हे उर्वरीत महाराष्ट्रातले होते. तर तब्बल 81 टक्के सहभागी 15 ते 40 या वयोगटातील होते.
या पोलचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे...
- 56.7 टक्के लोक म्हणतात, विदर्भ स्वतंत्र व्हायला नको...
- 36.4 टक्के लोकांना वाटतं की विदर्भाचा महाराष्ट्रात विकास होणार नाही
- स्वतंत्र नसल्यामुळे विदर्भाचा विकास खुंटला आहे असं 38 टक्के लोकांना वाटतं.
- विदर्भ वेगळा झाला तर अन्यत्रही अशा मागण्या होतील असं 71.9 टक्के जनतेला वाटतं
-39.6 टक्के सहभागी विदर्भातले, 24 टक्के पश्चिम महाराष्ट्रातले तर 14.1 टक्के मराठवाड्यातले
-72.9 टक्के सहभागी नोकरी करणारे आहेत, तर 12.9 टक्के व्यावसायिक आहेत