शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

राज्यात सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस

By admin | Published: September 17, 2015 1:35 AM

राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे.

मुंबई : राज्यात यंदा आतापर्यंत सरासरीच्या ५८ टक्केच पाऊस झाला आहे. धरणांमध्ये सरासरी ४९ टक्के पाणी शिल्लक असले तरी मराठवाड्यातील धरणांमध्ये ८ टक्केच पाणी आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली पण अलिकडे झालेल्या पावसाने किंचित दिलासा मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले. अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या चार जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २२ जिल्ह्यांमध्ये ५१ ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, यवतमाळ या ८ जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के पाऊस पडला आहे. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी फक्त एका तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ० ते २५ टक्के, ८८ तालुक्यात २६ ते ५० टक्के, १८० तालुक्यात ५१ ते ७५ टक्के, ६८ तालुक्यात ७६ ते १०० टक्के आणि १८ तालुक्यात तर १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. राज्यात मूग, उडीद, बाजरीच्या काढणीस सुरु वातखरीपाचे सरासरी क्षेत्र १३४ लाख ७० हजार हेक्टर असून ११ सप्टेंबर अखेर १३१ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ९७% क्षेत्रावर पेरणी झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात कमी पर्जन्यमानामुळे पिकांची वाढ असमाधानकारक असून पिकांच्या पुढील वाढीसाठी पुरेशा पावसाची नितांत आवश्यकता आहे. (विशेष प्रतिनिधी)जलसाठ्यांमध्ये ४९ टक्के साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के साठा होता. प्रकल्पातील विभागनिहाय आजचा आणि कंसात गतवर्षी याच दिवशीचा साठा ंअसा - मराठवाडा - ८ टक्के (४३), कोकण - ८७ टक्के (९३), नागपूर - ७५ टक्के (७९), अमरावती - ६२टक्के (७४), नाशिक - ४४ टक्के (७७) आणि पुणे - ४९ टक्के (९१), इतर धरणे - ७१ टक्के (९७) असा पाणीसाठा आहे. १५१५ गावे व ३२२७वाड्यांना १९९० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२ टँकरद्वारे पुरवठा करण्यात येत होता. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्यात ५ सप्टेंबरपर्यंत १४ हजार ५३० कामे सुरू असून या कामांवर एक लाख १२ हजार ७८४ मजुरांची उपस्थिती आहे.