शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

बस आणि टँकरच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू

By admin | Published: July 02, 2017 8:45 PM

पुणे- अहमदनगर हमरस्त्यावर हवेली तालुक्यातील लोणीकंद गावाजवळ टेम्पो ट्रव्हलर बस आणि पाण्याचा टँकर यांची समोरासमोर धडक झाली

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 2 - मिनी बस आणि पाण्याच्या टँकरमध्ये झालेल्या भिषण अपघातात पुण्यातील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल नऊ तरुण जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे नगर रस्त्यावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले. या विचित्र अपघातात पाठीमागून येत असलेल्या आणखी दोन मोटारी दुस-या वाहनांनाही धडकल्या. त्यामधील प्रवासीही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व तरुण हिंजवडी येथील कंपनीमध्ये कामाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.वैभव माने (वय 27, रा. म्हाळुंगे, बाणेर), महेश वसंत पवार (वय 28, रा. सासवड, ता. पुरंदर), नुपुर साहू (वय 26, रा. वनाज कॉर्नर, कोथरुड), निखील जाधव (वय 26, रा. भोसरी), अक्षय धबाडे (वय 28, रा, सांगवी), विशाल चव्हाण (वय 29, विमाननगर) अशी मृतांची नावे आहेत. तर सुमित प्रमोद मोरे (वय 28, रा. म्हाळुंगे), गणेश विलास शिंदे (वय 2, रा. म्हाळुंगे, बाणेर), अयुष गेहलोत (वय 26, रा. वनाज कॉर्नर, कोथरुड), विलास बिराजदार (वय 27, रा, बालेवाडी), सुरेश सिद्राम गायकवाड (वय 40, रा. बाणेर), रणजीर बाळासाहेब निकम (वय 29, रा, बाणेर), शरद शांताराम शेंडगे (वय 29, रा. बाणेर) अशी जखमींची नावे आहेत. हवेलीचे उपविभागीय अधिकारी सुहास गरुड यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमी पुणे नगर रस्त्याने एका मिनीबसमधून पुण्याच्या दिशेने येत होते. हे सर्वजण लग्नासाठी शनी शिंगणापूरजवळील सोनई येथे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणीकंद गावाजवळील रस्त्यावरुन पाण्याचा टँकर नगरच्या दिशेने जात होता. या टँकरने अचानक दुभाजकावरुन रस्त्याच्या दुस-या बाजुला वळण घेतले. त्याच वेळी पुण्याच्या दिशेने मिनीबस जात होती. या मिनीबसची विरुद्ध दिशेने येत असलेल्या पाण्याच्या टँकरला धडक बसली. बसचालकाने धडक टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र टँकरच्या चालकाच्या बाजुला ही बस धडकली. ही बस रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात उलटली. बसच्या काचा आणि दरवाजा निखळून बाजुला उडून पडले. दरम्यान, पाठीमागून येत असलेली एक मोटारही अपघातग्रस्त झाली. तर दुसरी मोटार एका कंटेनरवर जाऊन आदळली. बसमधील सर्व जखमींना स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने जवळच्या दोन खासगी रुग्णालयांमध्ये हलवले. यातील सहा जणांना उपचारांपुर्वीच मृत घोषित करण्यात आले. तर उर्वरीत नऊ जखमींवर उपचार सुरु आहेत. जखमींमधील बिराजदार किरकोळ जखमी असल्याने त्याला उपचार करुन सोडण्यात आले आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात त्याचा जबाब नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. लोणीकंद येथे झालेल्या या अपघातामुळे पुण्यातील कोथरुड, बाणेर, बालेवाडी आणि विमाननगर परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये सर्व तरुण असल्यामुळे अधिकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हे सर्वजण हिंजवडीमधील एका कंपनीमध्ये एकत्र काम करीत असल्याचे गरुड यांनी सांगितले. अपघात नेमका कसा झाला याचा तपास सुरु असून प्राथमिकदृष्ट्या टँकरचालकाच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचे दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.