शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

डोंबिवलीत चाळीवर झाड कोसळून ६ जण जखमी

By admin | Published: August 06, 2016 3:10 AM

सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले.

डोंबिवली : सागाव-नांदिवली येथील ‘संघवी गार्डन’जवळील कृष्णा पाटील चाळीवर शुक्रवारी दुपारी ४ वाजता जुने वडाचे झाड कोसळले. त्यात सहा जण जखमी झाले. त्यातील गुडिया मेहता या महिलेला छातीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना खाजगी रु ग्णालयात दाखल केले आहे.कल्याण-डोंबिवली परिसरात शुक्रवारी जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. त्यात नांदिवली येथील कृष्णा पाटील यांच्या चाळीवर दुपारी ४ वाजता १०० वर्षांचे जुने वडाचे झाड कोसळले. त्यात रहिवासी गुडिया मेहता, शरद वर्मा, रीना मेहता, अंजली मेहता, रखमा पाटील व विनिता म्हात्रे हे जखमी झाले. ही घटना समजताच स्थानिक शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे व प्रकाश म्हात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. तसेच अग्निशमन दल व मानपाडा पोलिसांना पाचारण केले. मात्र, केडीएमसीच्या ‘ई’ प्रभाग क्षेत्र विभागाच्या आपत्कालीन कक्षाशी फोनद्वारे संपर्क साधला असता तेथून कोणीच आले नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.गुडिया, शरद व रीना यांच्यावर रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. अंजली, रखमा व विनिता यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. या झाडामुळे चाळीतील चार खोल्यांचे नुकसान झाले. तसेच ‘महावितरण’चे सहा खांबही पडल्याने वीजपुरवठा बंद झाला. डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुसळधार पावसामुळे शेजारील झाड अचानक कोसळले. त्यामुळे काही वेळ पुलावर वाहतूककोंडी झाली. >मुंब्रा येथे दोन घरांच्या भिंती कोसळल्यामुंब्रा : रेल्वे स्थानकाजवळील शाहूनगर वसाहतीतमधील दोन घरांच्या मागच्या बाजूच्या भिंती नाल्यातील पाण्याच्या प्रवाहामुळे शुक्रवारी कोसळल्या. यामुळे या परिसरात खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही हानी झाली नाही. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून तेथील १३ घरांतील कुटुंबांना घरे रिकामी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची राहण्याची तात्पुरती व्यवस्था बाजारपेठेतील पालिका शाळा क्र मांक ७५ मध्ये केली आहे. >मुसळधार पावसामुळे रेल्वे विस्कळीतठाणे : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरीय गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले. रेल्वेमार्गात पाणी तुंबल्यामुळे काही काळ लोकलसेवा बंद करावी लागली होती. मुरबाड व शहापूर या दोन तालुक्यांना जोडणारा काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने या परिसरातील सुमारे २० गावांचा संपर्क तुटला आहे.जिल्ह्यात सकाळपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. आतापर्यंत सर्वाधिक ठाणे शहर परिसरात २३१५ मिमी पाऊस झाला असून कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, मुरबाड, अंबरनाथ तालुक्यांत पाऊस झाला आहे.