ठाणे : घर खरेदीसाठी माहेरून ६० लाख रुपये आणावेत, यासाठी सुनीता (६८), सासू, तुलस हिरानंदानी (७०) सासरे आणि पती नवीन यांनी छळ केल्याची तक्रार २८ वर्षीय विवाहितेने राबोडी पोलीस ठाण्यात केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्यातील कोपरी कॉलनी येथे राहणाºया या विवाहितेने २१ सप्टेंबर रोजी दिलेल्या तक्रारीनुसार १० जुलै २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात त्यांच्या पतीसह सासू आणि सासरे यांनी घरासाठी ६० लाख रु पयांची मागणी केली. ती वडिलांनी पूर्ण न केल्याने तिला घरगुती कारणावरून शिवीगाळ आणि शारीरिक, मानसिक त्रास दिला. तसेच लग्नात माहेरून मिळालेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांचादेखील त्यांनी अपहार केल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.
६० लाखांसाठी विवाहितेचा छळ, ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांचादेखील अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:30 AM