कणकवली : झाराप-पत्रादेवी मार्ग ४५ मीटर रुंदीचा असला तरी आता सर्व्हीस रोडसाठी ६० मीटरचे भूसंपादन केले जाणार आहे. चौपदरीकरणातील नुकसानभरपाईसाठी एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, भरपाई देताना हात आखडता न घेण्याच्या सूचना महसूल विभागाला देण्यात आल्या आहेत. महामार्गाचे चौपदरीकरण ही कोकणवासीयांना देणगी मिळालेली असून, सर्वांना विश्वासात घेण्यात येईल, असे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेवेळी आमदार वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, युवा सेना जिल्हाप्रमुख अॅड. हर्षद गावडे, तालुकाप्रमुख सचिन सावंत उपस्थित होते. रायगड येथील चौपदरीकरणातील चुका टाळण्यासाठी महसूल विभागाने सोयीने प्रक्रिया राबवावी. प्रत्येक जिल्ह्याच्या प्राधिकाऱ्याला आपल्या भागातील सर्वांना विश्वासात घेऊन कामकाजाची (पान ८ वर)पद्धत समजावून सहकार्य मिळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आमदार नीतेश राणे यांनाही बैठक घेऊन विश्वासात घेण्यात येईल. महामार्गावर स्थानिक, विद्यार्थी, गुरे आदींसाठी आवश्यक त्या ठिकाणी बॉक्सेल व ओव्हरब्रीज टाकण्यात येतील. ८० टक्के संपादनाचे काम पूर्ण झाले की निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. सप्टेंबरपर्यंत मोबदला देण्यात येईल, अशी माहिती खासदारांनी दिली. जैतापूरप्रश्नी पंतप्रधानांचे आश्वासन जैतापूर अणुऊर्जाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत अनेक वावड्या उठत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी यांना आम्ही प्रकल्प का नको हे समजावून सांगितले. त्यावर मी यातील तज्ज्ञ नाही. यासंबंधी समितीचा अहवाल आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला चर्चेला बोलवेन, असे आश्वासन दिल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. आघाडी सरकारसारखे राज्याने केंद्राचा प्रकल्प म्हणून हांजी हांजी करू नये. भाजपच्याच एका केंद्रीय कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्याने नितीन गडकरींना जैतापूर प्रकल्प नको, असे पत्राने कळविले होते. झोन ४ च्या अतिनिकट जैतापूर प्रदेश येतो आणि अणुऊर्जा प्रकल्पासाठी सुरक्षित नाही. याकडे सरकारचे दुर्लक्ष घातक ठरेल, असा अहवाल रोममधील एआयजीपी या संस्थेने दिला आहे. शिवसेना सोडवणार प्रश्नशिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पाणी व वीज समस्येला प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध माध्यमातून वीज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न राहणार असून, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून पाणी प्रश्न सोडवण्यात येणार आहे. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या छायाचित्र प्रदर्शनातून उभा राहिलेला सुमारे १० कोटी रुपये निधी व खासदार निधी जिल्हानिहाय खर्च केला जाणार आहे.
झाराप-पत्रादेवी मार्गासाठी ६० मीटर भूसंपादन होणार
By admin | Published: May 19, 2015 11:53 PM