शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
2
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
3
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
5
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
6
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
7
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
8
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
9
अरे देवा! सलूनमध्ये 'फ्री हेड मसाज' पडला महागात; ३० वर्षीय तरुणाला आला स्ट्रोक अन्...
10
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 
11
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालात तुफान राडा, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून बॉडीगार्ड्ना चोप 
12
Jio New Recharge Plan! दररोज १० रुपयांत मिळणार २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंगही; कोणता आहे प्लॅन?
13
जपानचे नवे पंतप्रधान चीनला शिकवणार धडा; नवा प्लॅन पाहून ड्रॅगनला बसणार धडकी!
14
“मविआ १८० जागा जिंकेल, फडणवीसांनी महायुतीचा विरोधी पक्षनेता ठरवावा”: बाळासाहेब थोरात
15
"देवाला तरी राजकारणापासून दूर ठेवा", सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री चंद्राबाबूंना झापले 
16
वर्षभरात अर्धी होतेय Smartphones ची किंमत; 'दिल मांगे मोअर'च्या नादात तुमचं मोठं नुकसान तर होत नाहीये ना?
17
अमेरिकेत जाणाऱ्यांसाठी खुशखबर! अमेरिकन दूतावास २.५ लाख अतिरिक्त व्हिसासाठी भेट देणार
18
फिल्मी क्वीनचा लक्झरी 'अंदाज'...! कंगना रणौतनं बंगला विकून काय केलं खरेदी? मोजले तब्बल 3 कोटी
19
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
20
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...

जळगाव विभागात वस्तू व सेवा करासाठी ६० टक्के नोंदणी पूर्ण

By admin | Published: December 30, 2016 8:08 PM

एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीसाठी खान्देशातील ६० टक्के करदात्यांनी नोंदणी केली

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 30 - एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणालीसाठी खान्देशातील ६० टक्के करदात्यांनी नोंदणी केली असून उर्वरित ४० टक्के नोंदणीही लवकरच होईल. या नव्या कर प्रणालीमुळे सुटसुटीत, पारदर्शकपणा येण्यासह एकूण राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) दोन टक्के वाढ होईल, असा विश्वास जळगाव विभागाचे विक्रीकर सह आयुक्त डॉ. बी.एन. पाटील यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ शहर कार्यालयास शुक्रवारी त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी विक्रीकरसह जीएसटी, संगणकीकरण यासह विविध विषयांवर मनमोकळेपणाने संवाद साधला. संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी सहायक विक्रीकर आयुक्त एस.बी. गोहील, एस. वाय. कुमावत, विक्रीकर अधिकारी आर.बी. पाटील उपस्थित होते. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादकीय प्रमुख मिलिंद कुळकर्णी व लेखा व्यवस्थापक सुधीर बाजल यांनी स्वागत केले.वस्तू व सेवा कराचा मोठा फायदा होऊ वस्तू व सेवा कर ही करप्रणाली मोठी फायदेशीर असून यामुळे राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) दोन टक्क्याने वाढ होऊ शकते. यासोबतच यामुळे कर चुकविण्यास पूर्ण आळा बसणार असून देशातील एकही व्यापारी खाते लपवू शकणार नाही. त्यामुळे कर पद्धतीत पारदर्शकतादेखील येईल.या सोबतच आतापर्यंत केवळ वस्तूंवर कर आकारला जात होता. यामध्ये वस्तूंसह सेवेवर कर आकारला जाणार असून यामुळे कराचे दर कमी होणार आहे आणि करदाते वाढणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. नव्या कर प्रणाली साठी विक्रीकर विभागही सज्जवेगवेगळ््या राज्यात असलेले वेगवेगळे कर ‘जीएसटी’मुळे राहणार नसून देशभर एकच कर प्रणाली राहणार असल्याने या करप्रणालीस व्यापाऱ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६० टक्के करदात्यांनी नोंदणी केली असून याच्या जनजागृतीसाठी व्यापारी संघटनांशी चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये सेवा कर, केंद्रीय अबकारी कर, विक्रीकर याबाबत प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे. या नव्या करप्रणालीसाठी विक्रीकर विभागही पूर्णपणे सज्ज आहे, असे पाटील म्हणाले. वस्तू व सेवा कराचे स्वरूपवस्तू व सेवा कर तीन प्रकारात राहणार आहे. राज्याचा वस्तू व सेवा कर (एसजीएसटी), केंद्रीय वस्तू व सेवा कर (सीजीएसटी) आणि आंतरराज्य वस्तू व सेवा कर (आयजीएसटी) असे तीन प्रकार राहणार आहे. यासाठी एक घटनात्मक समिती असून यामध्ये सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांसह केंद्रीय अर्थमंत्र्यांचा या समितीत समावेश आहे, असे पाटील यांनी नमूद केले.