औरंगाबाद : मराठवाड्यात आगामी काळात पाणी व चारा टंचाईचे संकट आणखी गंभीर होण्याची चिन्हे असून विभागातल्या सर्व जिल्ह्यांना टंचाई आराखडे तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत ६१ कोटी ६८ लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.विभागात टँकरची संख्या १,३०० पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मराठवाड्यात सध्या ५०० हून अधिक टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. लघु आणि मध्यम पाणीसाठे कमी होत चालल्यामुळे पाण्याची टंचाई वाढत चालली आहे. नांदेड, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत सर्वाधिक टँकरची मागणी आहे. पाणी टंचाईच्या निवारणासाठी प्रशासनाकडून टँकर, विहीर अधिग्रहण, तसेच पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून टंचाई निवारणाचे प्रयत्न सुरू आहेत. नांदेडमधून तीन महिन्यांसाठी १७ कोटी ५९ लाख १२ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. बीडमध्ये १४ कोटी २२ लाख ३९ हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी ६ कोटी ९८ लाख रुपये लागणार आहेत. (प्रतिनिधी)तीन महिन्यांचाटंचाई आराखडाजिल्हा अंदाजित खर्च (लाखांत)औरंगाबाद६९८.४५जालना१८०.४४परभणी३३९हिंगोली३०८.८३नांदेड१७५९.१२बीड१४२२.३८लातूर७५०.९४उस्मानाबाद७०८.९७एकूण६१६८.८२
६१ कोटींचा टंचाई आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2015 1:03 AM