ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या विमानातून जवळपास 62 लाख रुपयांचे सोने हवाई गुप्तचर विभागाने जप्त केले.
गेल्या शनिवारी मुंबई विमानतळावर दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सोन्याची तस्करी उघड झाली होती. या कारवाईत एकूण सुमारे 65 लाख किमतीचे सोने जप्त करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा आज एअर इंडियाच्या एका विमानातील सीटच्या पोकळ पाईपमधून सोने बेकायदेशीररित्या भारतात आणल्याची महिती हवाई गुप्तचर विभागाला मिळाली, त्यानुसार केलेल्या कारवाईत दोन किलोपेक्षा जास्त सोने जप्त करण्यात आले. यात प्रत्येकी 116 ग्रॅमची 20 सोन्याची बिस्किटे आणि एक सोन्याचे नाणे या कारवाईत जप्त करण्यात आले. मात्र या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते.
दरम्यान, मुंबई विमानतळावर अन्य देशांतून आलेल्या भारतीयांकडे मोठय़ा प्रमाणावर अवैध्य मार्गाने आणण्यात आलेले सोने सापडत असल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहेत.
AIU recovered 2362 gms gold valued at Rs 62 lakh frm a passenger at Mumbai Airport. Gold ws concealed inside hollow pipe in one of the seats— ANI (@ANI_news) February 13, 2017