महायुती : घटक पक्षांच्या गळ्यात मारण्याचीही तयारी, अदलाबदलीसाठी विरोध नाही
विवेक भुसे -पुणो
राज्यात मोदीलाटेच्या जोरावर शिवसेना - भारतीय जनता पार्टी विधानसभेवर भगवा फडकाविण्याच्या जोशात असले, तरी तब्बल 62 जागा युतीच्या दृष्टीने अत्यंत कठीण मानल्या जात आहेत. युती होऊन 25 वर्षे झाली तरी या 62 जागांवर कधीही विजय मिळविणो शक्य झालेले नाही. या जागांवर कॉँग्रेस - राष्ट्रवादीतील एखादा मातब्बर नेता गळाला लागला तर ठीक, नाहीतर यातील काही जागा घटक पक्षांच्या गळ्यात मारण्याची युतीची तयारी आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक 23 जागा या पश्चिम महाराष्ट्रातील आहेत.
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट असल्याने 288पैकी जवळपास 24क् विधानसभा मतदारसंघांत महायुतीला मताधिक्य मिळाले होत़े मात्र, लोकसभेची गणिते विधानसभेला चालतीलच याची खात्री नाही. त्यामुळे या 62 जागांसाठी वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. या सर्वात कठीण जागांमध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या 45 जागा आहेत, तर भाजपाच्या 17 जागा आह़े
या जागांवर युतीचा उमेदवार हा तिस:या, चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता़ विजयी उमेदवार आणि युतीच्या उमेदवारांच्या मतांमध्ये 2क् हजार मतांहून अधिक मतांचा फरक होता़ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे
गेल्या निवडणुकीत मुंबई व उपनगरांमधील 36 जागांपैकी शिवसेनेच्या 5 आणि भाजपाच्या 7 जागांवरील युतीचे उमेदवार तिस:या क्रमांकावर गेले होत़े त्या जागा युतीने सर्वात कठीण म्हणून गणल्या गेल्या आहेत़
युतीला गेल्या विधानसभा मतदारसंघात ठाणो आणि कोकण पट्टय़ातील 39 मतदारसंघांपैकी फक्त 3 जागा सर्वात कठीण म्हणून ओळखल्या जातात़ विदर्भातील 62 जागांपैकी 11 जागा आणि उत्तर महाराष्ट्रातील 35पैकी 8 जागा सर्वात कठीण आहेत़ मराठवाडय़ातील 46पैकी 13 जागा सर्वात कठीण आहेत़
या मतदारसंघांवर लक्ष
श्रीगोंदा, नवापूर, कन्नड, डहाणू, भांडुप, माहीम, धुळे शहर, नाशिक (पश्चिम), दौंड, नंदुरबार, क:हाड (दक्षिण), सातारा, कोल्हापूर (दक्षिण), इंदापूर, बारामती, लातूर शहर, बार्शी, सोलापूर शहर, वाई, कोरेगाव, चंदगड, शिराळा अशा विविध 62 मतदारसंघांत युतीला यश मिळणो आजवर शक्य झाले नाही़ म्हणून त्या ठिकाणी ते बाहेरून उमेदवार आयात करीत आहेत़ कन्नडमधील मनसेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेत आले आहेत़
शिवसेना आणि भाजपाचे सध्या 92 आमदार असून, मागील निवडणुकीत 1क् हजार मतांपेक्षा कमी मतांनी पराभूत व्हावे लागलेल्या अशा 47 जागा आहेत़
ज्या मतदारसंघात युतीचा उमेदवार दुस:या क्रमांकावर होता पण 1क् हजार मतांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला अशा युतीच्या 78 जागा असून, या जागांवर ख:या अर्थाने चुरस दिसून येत आह़े यातील काही जागा महायुतीतील घटक पक्ष मागत आह़े मागील विधानसभा निवडणुकीत कागल, राधानगरी, पलुस, इस्लामपूर तसेच शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती केल्याने अशा 9 जागांवर शिवसेना, भाजपाचा उमेदवार नव्हता़
बी प्लस : 1क् हजारपेक्षा कमी मतांनी पराभूत
बी : दुस:या क्रमांकावर पराभूत
सी : तिस:या व अधिक क्रमांकावर उमेदवार
निवडणूक 2क्क्9चे चित्र
शिवसेनाभाजपा
विजयी4547
बी प्लस जागा 272क्
बी4325
सी4517
16क्119