मुंबई : उन्हाळी सुट्टीत मेल-एक्स्प्रेसने बाहेरगावी जाणाऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने ६२६ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेवरील सावंतवाडी, करमाळी, साईनगर शिर्डी, लखनौ, जम्मू तावी, गोरखपूर, पुणे, एर्नाकुलम, पटणा आदींसाठी या फेऱ्या आहेत. या ट्रेन एप्रिल ते जून महिन्यापर्यंत धावतील. सीएसटी - सावंतवाडी ते सीएसटीसाठी १८ फेऱ्या, एलटीटी-करमाळी-एलटीटी दरम्यान १८, एलटीटी-सावंतवाडी-एलटीटी दरम्यान २0 फेऱ्या, एलटीटी ते साईनगर शिर्डीसाठी १३, साईनगर शिर्डी-दादर-साईनगर शिर्डी दरम्यान ३९ फेऱ्या, सीएसटी-लखनौ-सीएसटीसाठी २६ फेऱ्या, सीएसटी-जम्मू तावी-सीएसटी २६ फेऱ्या, एलटीटी-गोरखपूर-एलटीटीसाठी २६ फेऱ्या, एलटीटी-मंदुदै-एलटीटीसाठी २४ फेऱ्या होतील. एलटीटी-गोरखपूर-एलटीटीसाठी २६, अजनी-मडगाव-अजनीसाठी २0, सीएसटी-पटणा-सीएसटीसाठी २६ तर पुणे-एर्नाकुलम-पुणेसाठी २0 फेऱ्या, पुणे-पटणा-पुणेसाठी २६ फेऱ्या, पुणे-तिरुनेलवेल्ली-पुणे दरम्यान २0 फेऱ्या आणि नागपूर ते पुणेसाठी (अनारक्षित ट्रेन)११ फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. (प्रतिनिधी) एसटीच्या जादा फेऱ्या १५ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या उन्हाळी हंगामासाठी एसटी महामंडळाने जय्यत तयारी केली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या प्रमुख शहरातून वेळापत्रकातील लांब व मध्यम लांब फेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे १७७ जादा फेऱ्या सोडण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या फेऱ्यांचे आरक्षण आॅनलाइनवर उपलब्ध करण्यात आले आहे. प्रवाशांचा प्रतिसाद व मागणीनुसार फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे. १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत एसटीकडून गर्दीच्या हंगामासाठी जादा वाहतुकीचे नियोजन केले जाते. एसटीला दरवर्षी या हंगामात प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. पण गेल्या वर्षी याच काळात दुष्काळ व संपूर्ण मे महिन्यात एकही लग्न मुहूर्त नसल्याने प्रवासी भारमानावर परिणाम झाला होता. या वर्षी चांगला पाऊस पडल्याने व मे आणि जूनमध्ये ३० लग्नाचे मुहूर्त असल्याने प्रवाशांची गर्दी वाढणे अपेक्षित आहे. हे पाहता एसटीकडून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेकडून ६२६ उन्हाळी विशेष फेऱ्या
By admin | Published: March 31, 2017 4:20 AM