ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. १६ : शासनाने भारतीय चलनातून ५०० व १ हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर सर्वत्र बँकांमध्ये जुन्या चलनी नोटा भरण्यासाठी व नवीन नोटा बदलून घेण्यासाठी जिल्हाभरातील बँकांमध्ये गर्दी होत आहे. पाच दिवसात जिल्हाभरातील बँकांमध्ये तब्बल ६३६ कोटी ८ लाखांची रक्कम संकलित झाली आहे. यात एकट्या स्टेट बँक आॅफ इंडियाकडे ३४९ कोटी ९४ लाखांची रक्कम जमा झाली आहे.
शासनाच्या निर्णयाने बँकांकडे ओघ वाढलाशासनाने अचानकपणे जुन्या चलनी नोटा रद्द केल्यामुळे ग्राहकांची बँकेत हजार व ५०० रुपयांच्या नोटा भरण्यासाठी आणि चलन बदलून घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. जिल्हा अग्रणी बँकेतर्फे बुधवारी जिल्हाभरातील सर्व बँकांमध्ये जमा झालेल्या ठेवींची माहिती घेण्यात आली.
जिल्हा बँकेत दोन दिवसात ११७ कोटीजिल्हा बँकेतील शेतकऱ्यांच्या थकित पीककर्जाची रक्कम जुन्या चलनी नोटाद्वारे भरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सवलत दिली होती. त्यामुळे जिल्हा बँकेकडे दोनच दिवसात ११७ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर शासनाने जिल्हा बँकांना जुन्या नोटा स्विकारू नये असे आदेश काढले. त्यामुळे जिल्हा बँकेने उर्वरित दिवसांची माहिती अग्रणी बँकेकडे पाठविलेली नाही.
स्टेट बँकेत ३५० कोटींची गंगाजळीजिल्ह्यात सर्वाधिक रक्कम ही स्टेट बँकेत जमा झाली आहे. स्टेट बँकेत गुरुवार १० रोजी ६४ कोटी ६३ लाख, ११ रोजी ८१ कोटी ७९ लाख, १२ रोजी ७३ कोटी १३ लाख, १३ रोजी ६६ कोटी ७३ लाख व १५ रोजी ६३ कोटी ६६ लाख अशी ३४९ कोटी ९४ लाखांची रक्कम जमा झाली आहे.
या बँकानी सादर केली माहितीअग्रणी बँकांनी मागविलेल्या माहितीनुसार सेंट्रल बँक आॅफ इंडिया, आयडीबीआय बँक, पीएनबी बँक, एस.बी.आय.बँक, आयओसी बँक, इको बँक, बँक आॅफ बडोदा, युनायटेड बँक, जिल्हा मध्यवर्ती बँकेने माहिती सादर केली आहे.