शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

महाप्रसादाच्या भगरीतून ६५० जणांना विषबाधा; मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2024 9:14 AM

लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

लातूर/हिंगोली : महाप्रसादातील भगर खाल्ल्याने लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील ४६७ जणांना विषबाधा झाली आहे. याशिवाय परभणी, बीड आणि धुळे जिल्ह्यातही असे प्रकार घडले आहेत. पाच जिल्ह्यात एकूण ६५० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या. लातुरमधील देवणी तालुक्यातील वागनाळवाडी व खरबवाडी (गुरधाळ) येथे ४४३, तर हिंगोलीतील खुडज (ता. सेनगाव) येथील २४ भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली.

 वाघनाळवाडी येथे एकादशीनिमित्त गुरुवारी सायंकाळी भगरीचा प्रसाद देण्यात आला. तो खाल्ल्याने  ३१५ जणांना गुरुवारी रात्री त्रास झाला. डॉक्टरांनी गावातच ३०६ जणांवर उपचार केले. खबरवाडी (गुरधाळ) येथेही ९३ जणांवर प्रथमोपचार करण्यात आले. 

हिंगोलीत २४ भाविकांना विषबाधा  पंधरवड्यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील दीडशे भाविकांना भगर खाल्ल्याने विषबाधा झाली होती. पुन्हा गुरुवारी खुडज (ता.सेनगाव) येथील २४ भाविकांना भगरमधून विषबाधा झाली. 

परभणीत ८० बाधितपरभणी जिल्ह्यात गुरुवारी, शुक्रवारी दोन दिवस उपवासाला भगर खाल्ल्याने जिल्ह्यातील ८० जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यातील ५० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार यांनी दिली.

बीडमध्ये ५५ जणअंबाजोगाई व गेवराई तालुक्यातील तब्बल ५५ जणांना विषबाधा झाली. उपवासाची भगर खाल्ल्याने ही बाधा झाल्याचे सांगण्यात आले. या सर्वांवर शासकीय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. 

धुळे ५२ बाधिततालुक्यातील अमळथे येथे भगर खाल्याने ५२ जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच बालके, २० महिलांचाही समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.  

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाMahashivratriमहाशिवरात्रीhospitalहॉस्पिटल