महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर, आता सर्वांचे लक्ष लागले आहे, ते खातेवाटप आणि नव्या सरकारच्या शपथविधीकडे. राज्यातील महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी गुरुवार, 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. या सोहळ्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. यातच आता, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत अजित पवार 11 पदे मागण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे.
यासंदर्भात एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अजित पवार, महाराष्ट्रात 7 कॅबिनेट आणि दोन राज्य मंत्री पदे, केंद्रात एक कॅबिनेट आणि कुठळ्याही एखाद्या राज्यात राज्यपाल पदाची मागणी करू शकतात. पक्षाच्या एखाद्या वरिष्ठ नेत्यासाठी राज्यपाल पद आणि प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात कॅबिनेट पद मिळावे, अशी अजित पवार यांची इच्छा आहे.
अजित पवार सोमवारपासून दिल्लीत -राज्यात 5 डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यापासून ते दिल्लीपर्यंत राजकीय हालचाली बघायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार सोमवारपासूनच दिल्लीत आहेत. ते अमित शाह यांचीही भेट गेण्याची शक्यता आहे. यापूर्वी, महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाह यांच्यासोबत एक बैठकही झाली आहे.
कोणत्या पक्षाला किती खाली मिळू शकतात?माध्यमांतील वृत्तानुसार, महाराष्ट्रातील नव्या महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाकडे 21 ते 22 खाती असू शकतात. यांत गृह मंत्रालय तसेच सभापतीपद भाजपला मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर विभागांसंदर्भात नंतर चरर्चा होणार असल्याचे समजते. याशिवाय, राज्यातील नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 11 ते 12 खाती, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 खाती मिळण्याची शक्यता आहे.
कुणाला कोणते खाते? -माध्यमांतील वृत्तांनुसार, भाजपकडे गृह आणि महसूल सारखे खाते कायम राहू शकते. याशिवाय त्यांना सभापती आणि विधान परिषदाध्यक्ष पदही मिळू शकते. राष्ट्रवादीला अर्थ, तर शिंदेंच्या शिवसेनेला शहरी विकास खाते मिळू शकते. याशिवाय इतर खात्यांवर नंतर चर्चा केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला 132, शिवसेनेला 57 तर राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या आहेत.