मुंबई : मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य मागासवर्गीय आयोगातर्फे राबविली जाणारी सर्वेक्षण मोहीम वेळेत पूर्ण करण्याबाबतचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना दिले. या सर्वेक्षणासाठी सात दिवसांची विशेष मोहीम राबविली जाणार आहे.
पुणे येथील गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या माध्यमातून यासाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे विविध प्रश्नावलीच्या माध्यमातून ही माहिती संकलित करण्यात येणार आहे. या बैठकीला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, सामान्य प्रशासन सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.