शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

विरारमध्ये ७ लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2016 4:08 AM

विरार पूर्वेकडील एका सुपरमार्केटमध्ये घुसून चोरट्यांनी ७ लाखांची रोकड लंपास केली.

विरार : विरार पूर्वेकडील एका सुपरमार्केटमध्ये घुसून चोरट्यांनी ७ लाखांची रोकड लंपास केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, दुकान मालकाने चोरट्यांना ओळखले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप कोणतीच कारवाई केलेली नाही. विरार पूर्वेला जीवदानीच्या पायथ्याशी असलेल्या एका सुपर मार्केटमध्ये १३ तारखेच्या रात्री दोन चोरट्यांनी दुकानामागील एक्झास फॅन तोडून दुकानामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला चोरांनी सुपर मार्केटमधील सामान चोरण्याचा प्रयत्न केला. पण दुकानात तिजोरी असल्याचे लक्षात आल्यावर चोरट्यांनी स्क्रूड्रायव्हरच्या साह्याने तिजोरी फोडून ७ लाख रुपयांची रोख आणि १० ते १५ हजारांची चिल्लर लंपास केली. सुट्या असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. यामुळे मालकाने दोन दिवसांचे जमा झालेले पैसे तिजोरीत ठेवले होते. चोरांनी सीसीटीव्हीचे डीव्हीआर काढून नेले होते. मात्र, त्यांनी ते दुकानाच्या मागच्या बाजूच्या कचऱ्यात टाकून दिले होते. या सीसीटीव्ही फूटेज आधारे दुकानमालक आणि कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना ओळखले आहे. चोरटे साईनाथनगरातील रहिवासी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (वार्ताहर)