शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

देवदर्शन करुन परतणा-या कुटुंबावर काळाचा घाला, 7 जणांचा मृत्यू

By admin | Published: April 21, 2017 7:22 AM

मिरज-पंढरपूर हायवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 10 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

सांगली, दि. 21 - देवदर्शनाहून भाविकांना परत घेऊन येणारी मिनीबस थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर जाऊन आदळल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे (ता. करवीर) येथील दोन महिलांसह सात जण मृत्यू झाला आहे तर 11 जण जखमी झालेत. ही घटना मिरज-पंढरपूर रस्त्यावरील सांगली जिल्ह्यातील आगळगांव फाटा (ता. कवठेमहाकाळ) येथे गुरुवारी मध्यरात्री घडली. 
मृतामध्ये दोन शाळकरी मुलांचा समावेश आहे. या अपघातामुळे वळीवडे येथील कोयना कॉलनीमधील म्हसोबा माळ येथे शोककळा पसरली. कवठेमहाकाळ येथे शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तर सायंकाळी वळीवडेत मृतांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारजवळील तावडे हॉटेलपासून  वळीवडे (ता. करवीर) हे सर्वधर्मियांचे गाव  होय. वळीवडे अर्थात गांधीनगरची  मोठी बाजारपेठ असलेले असलेली ओळख आहे. गांधीनगरात कोल्हापूर जिल्ह्यासह शेजारच्या जिल्हयातून कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी रोज हजारो ग्राहक येतात. वळीवडेतील कोयना कॉलनी होय. या कॉलनी जवळ असलेला म्हसोबाचा माळ ही वस्ती लोकवस्ती. सेंटरिंग कामगारपासून ते धुणी -भांडी अशी मोलमजुरीची कामे करणा-यांची संख्या याठिकाणी जास्त आहे. 
 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दरवर्षी प्रमाणे यंदाही म्हसोबाच्या माळ्यातील नंदकुमार जयवंत हेगडे यांच्यासह त्यांचे नातेवाई आणि मित्रमंडळी देवदर्शनासाठी सोमवारी (दि. १७) गेले. पंढरपूर येथून देवदर्शन घेऊन घरी परत येत असताना गुरुवारी (दि. २०) रात्री मिनीबसचा वाळूने थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन जण जागीच ठार झाले तर दुस-या कुटुंबातील अन्य चार असे एकूण सात मृत्युमुखी पडले. तसेच ११जण जखमी झाले. या प्रकाराने शुक्रवार सकाळपासून म्हसोबाचा माळ सुन्न झाला.
 
कोयना कॉलनी म्हसोबा माळ येथे १९८७ ला मागासवर्गीय गृहनिर्माण कामगार सोसायटी स्थापन झाली. म्हसोबा माळावर ३६ प्लॉट  आहेत. कोल्हापूर जिल्हयातील सांगाव, कागल, बानगेसह निपाणी परिसरातील स्थलांतरीत म्हसोबाच्या माळावर राहू लागले. त्यातील काही जण सेंटरिंग काम, फरशी बसविणारे तर महिला धुणी-भांडी करतात. दरवर्षी उन्हाळी सुट्टीच्या काळात या परिसरातील दोन-तीन घरातील मिळून सर्वजण एकत्रित देवदर्शनासाठी जातात.
 
यंदा नंदकुमार जयवंत हेगडे  (वय ४२) यांच्यासह त्यांच्या पत्नी रेणुका ( ३२), मुलगा आदित्य (१४) व सासूबाई रेखा राजाराम देवकुळे (६०) यांच्यासह सुमारे  २७ ते २८ लोक एक मिनीबस आणि एक चारचाकी वाहन अशा दोन वेगवेगळ्या वाहनातून देवदर्शनाला गेले. मिनीबसमध्ये  १९ तर दुस-या चारचाकी वाहनामध्ये ९ जण होते. सोमनाथ मंदिर, विजापुरससह अल्लमट्टी धरण, बदामी, अक्कलकोट, तूळजापूर करुन गुरुवारी (दि. २०) सायंकाळी सर्वजण पंढरपूर (जि. सोलापूर) येथे आले.
त्याठिकाणी देवदर्शन करुन पुढे चार-पाच किलोमीटर जाऊन पाण्याचे ठिकाण असलेल्या रस्त्याजवळ ते थांबले.
 
तेथे जेवण करुन रात्री कोल्हापूरला येण्यास निघाले. त्यावेळी मध्यरात्री मिरज-पंढरपूर रस्त्यावर आगळगांव फाट्याजवळ (ता. कवठेमहाकाळ) थांबलेल्या वाळूच्या ट्रकवर मिनीबस जाऊन आदळली. यात मिनीबसमधील दोन लहान मुलांसह सहाजण जागीच ठार झाले तर ११ जण जखमी झाले. मृतांना  कवठेमहाकाळ येथील ग्रामीण रुग्णालयात तर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये  नेण्यात आले. जखमीपैकी  रेखा राजाराम देवकुळे या शुक्रवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत झाल्या. त्या मृत झाल्याचे समजताच म्हसोबा माळमध्ये एकच आक्रोश होऊन सन्नाटा निर्माण झाला. हा प्रकार समजताच आमदार अमल महाडिक, हेमलता माने, निवास लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य बुचडे, सचिन जोशी, अनिल हेगडे, राजू ठोमके  यांच्यासह म्हसोबा माळ येथे धाव घेऊन सात्वंन केले.
 
आम्ही १० किलोमीटर पुढे गेलो होतो  : मालन कांबळे 
देवदर्शन करुन आम्ही गुरुवारी रात्री पंढरपूर येथे विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले. तेथून देवदर्शन घेऊन अवघ्या चार-पाच किलोमीटर आम्ही जेवण करण्यासाठी थांबलो. सर्वांनी जेवण केले. त्यानंतर आम्ही एकाच वाहनात आठ-नऊ जण होतो तर मिनीबसमध्ये नंदकुमार हेगडे यांच्यासह १९ जण होते.आगळगांव फाट्याहून पुढे सुमारे दहा किलोमीटर आमचे वाहन पुढे गेले. त्यावेळी आमच्या चालकाला मिनीबसच्या चालकाचा अपघात झाल्याचा मोबाईलवर फोन आला. त्यामुळे पुन्हा आम्ही परतून  घटनास्थळी गेले. त्याठिकाणी मिनीबसचे अंगावर शहारे आणणारे होते. भितीमुळे आम्ही सर्वजण चारचाकी वाहनामध्ये बसून होतो. हा अपघाताचा प्रकार समजताच तेथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरु केले अशी माहिती शुक्रवारी सकाळी म्हसोबा माळ येथील मालन रमेश कांबळे यांनी पत्रकारांना दिली.
 
मिनीबस चालक पसार 
म्हसोबा माळ येथील नंदकुमार  हेगडे यांच्यासह मित्रमंडळींना मिनीबसमधून नेणारे माले (ता. हातकणंगले) येथील मिनी बसचा चालक हा दुर्घटनेनंतर पसार झाला. त्याला शुक्रवारी दुसरे भाडे असल्याने त्याने गुरुवारी रात्रीच आपण सर्वजण निघुया, असे सांगितले असल्याचे म्हसोबा माळमधील नागरिकांनी पत्रकारांना सांगितले.
 
सासूसह जावई ठार 
रेखा  राजाराम देवकुळे यांचे जावई नंदकुमार हेगडे, त्यांची पत्नी रेणूका ,नातू आदित्य असे चौघेजण या अपघातात ठार झाले. नंदकुमार हे सेंटरिंग तर रेणूका या अंगणवाडी सेविका होत्या. त्यांचा मुलगा आदित्य हा मुक्त सैनिक वसाहत येथील शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल येथे सातवी मध्ये शिक्षण घेत होता.
 
मृतांची नावे 
रेखा राजाराम देवकुळे , नंदकुमार जयवंत हेगडे,  रेणूका नंदकुमार हेगडे,  आदित्य हेगडे ,  रोनक राजू नरंदे (वय ८), विनायक मार्तंड लोंढे (४२  सर्व राहणार म्हसोबा माळ, कोयना कॉलनी), लखन राजू संकाजी (२५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, वळीवडे)
जखमींची नांवे  
कल्पना शाहू बाबर (वय ३५), शिला सुुनील हेगडे (३९), काजल कृष्णात हेगडे (१९), स्नेहल उर्फ  नेहा कृष्णात  हेगडे (२०), सारिका संजय कांबळे  ( ४०),  शुभम संजय कांबळे  (८), भारती संजय कांबळे  (२०), सावित्री बळवंत आवळे ( ५५), श्वेता कृष्णा हेगडे ( १५), अनमोल नंदकुमार हेगडे (३८) , गौरी उर्फ संस्कृती कृष्णात हेगडे  (८)  
 
लखन कापड दुकान तर  विनायक सेंटरिंगचे काम करायचे 
मृत लखन संकाजी हा गांधीनगरमध्ये कापड दुकानात कामास होता. तो अविवाहित होता. विनायक लोंढे हा  सेंटरिंगचे काम करत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. रोनक नरंदे हा गांधीनगरमधील  कुमार विद्यामंदिर येथे पहिलीमध्ये शिक्षण घेत असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले.
 
अपघातातील मृतांची नावं 
विनायक मार्तंड लोंढे (वय ५०) 
गौरव राजू नरदे (वय ९)
लखन राजू संकाजी (वय ३०)
 रेणुका नंदकुमार हेगडे (वय ३५)
नंदकुमार जयराम हेगडे (वय ४०)
आदित्य नंदकुमार हेगडे (वय१३ )