मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे रेडिरेकनर दरात केवळ ७ टक्के वाढ करण्यात आल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.राज्यातील वेगवेगळ्या भागातून रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारडे दाखल झाल्या आहेत. याचा विचार करून आम्ही यावर्षी हा दर ७ टक्के वाढविला. २०१० साली या दरात १४, २०११ - १८, २०१३ - २७ आणि २०१४ - २२ टक्के असा वाढविला होता. असे खडसे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
रेडीरेकनरमध्ये ७ टक्के वाढ
By admin | Published: April 01, 2016 2:01 AM