स्नेहा मोरे, मुंबईकालौघात अनेक भाषा लुप्त झाल्या, तर काहींनी शिलालेखांच्या माध्यमातून आपले अस्तित्व टिकवले आहे़ जगभरात तब्बल ७ हजार १०२ भाषा अजूनही प्रचलित असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे़ पाली, अवेस्ता, अर्धमागधी अशा भाषा आता केवळ अभ्यासापुरत्याच राहिल्या आहेत, असे म्हणण्यात वावगे ठरणार नाही़ त्यामुळे अशा लुप्त होत चाललेल्या तसेच प्रचलित असलेल्या भाषांचे जतन व संवर्धन हा प्रत्येक देशाचा अजेंडा असतो. त्या आधारे वर्ल्ड लिव्हींग लँग्वेज कॅटलॉगने विविध भाषांचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून सध्या प्रचलित असलेल्या भाषांची संख्या समोर आली आहे. विशेष म्हणजे याद्वारे २३ प्रमुख भाषा या जवळपास ५ कोटी लोकांची मातृभाषा असल्याचे अहवालात म्हटले आहे़भाषांच्या या सर्वेक्षणात ६३ लाख व्यक्तींशी संपर्क साधण्यात आला. पैकी ४१ लाख व्यक्ती स्थानिक भाषांमध्ये संवाद साधणारे होते. इतर सर्वेक्षणांमध्ये जात, धर्म हे घटक महत्त्वाचे आणि ‘संवेदनशील’ ठरत असताना भाषा हेदेखील कोणत्याही समाजाचे मोठेच मानववंशशास्त्रीय परिमाण आहे आणि भाषेआधारे आपला वेगळेपणा सिद्ध करता येतो वा टिकवताही येतो, याविषयी फारशी जागरूकता नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.भाषांच्या सुरू असलेल्या ऱ्हासाला बाजारपेठ, सत्ता आणि शक्तीचा प्रभाव कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही भाषेच्या उत्क्रांतीतून पुढील काही वर्षांमध्ये प्रतिमेची भाषा निर्माण होईल, असा निष्कर्ष अहवालात मांडण्यात आला आहे. युरोपीयन नेत्यांच्या भेटीइंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश भाषांची मुळे ही प्राचीन वैभव असलेल्या देशांमध्ये असल्याने या भाषा सर्वाधिक बोलल्या जातात. अरेबिक, फ्रेंच, चायनिझ, स्पॅनिश या भाषा अनुक्रमे ६०, ५१ आणि ३३ देशांमध्ये बोलल्या जातात. सर्वाधिक शिकल्या जाणाऱ्या भाषांमध्येही इंग्रजी भाषेने बाजी मारली असून, त्यानंतर फ्रेंच, चायनिझ, स्पॅनिश, जर्मन आणि इटालियन आदी भाषांचा समावेश आहे, असे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
७ हजार भाषा अस्तित्व टिकवून!
By admin | Published: July 07, 2015 3:25 AM