ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 10 - अमरावती महामार्गानजीक असलेल्या वेणा जलाशयात रविवारी सायंकाळी पिकनिकसाठी गेलेल्या तरुणांचे सेल्फी काढणे त्यांच्याच जिवावर बेतले. एकाच भागात जास्त भार झाल्यामुळे डोंगा असंतुलित होऊन उलटली. परिणामी 7 जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. या नावेत 11 जण होते. त्यातील चौघा जणांना वाचवण्यात यश आलं असून, रात्री उशिरा एकाचा मृतदेह सापडला.कळमेश्वर पोलिसांना या दुर्घटनेची माहिती तब्बल दोन ते अडीच तास उशिराने मिळाली. पण त्यांनी लागलीच बचावकार्य सुरू केले. आजूबाजूच्या गावातील मच्छीमार तसेच अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले. रात्री 9.30पर्यंत तीन तरुणांना वाचविण्यात त्यांना यश आले. तर राहुल जाधव याचा मृतदेह हाती लागला.कळमेश्वरचे ठाणेदार चंद्रशेखर बहादुरे यांनी लोकमतला दिलेल्या माहितीनुसार, आठवा मैल वाडी तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणारे अमोल मुरलीधर दोडके (28), रोशन मुरलीधर दोडके, राहुल जाधव, अंकित अरुण भोसकर (22), परेश काटोके, अतुल भोयर, पंकज डोईफोडे, प्रतीक आमडे, रोशन ज्ञानेश्वर खांदारे (23) आणि अक्षय मोहन खांदारे हे रविवारी पिकनिकसाठी धामणाजवळच्या वेणा जलाशय परिसरात गेले होते. सायंकाळी 6.30च्या सुमारास अतुल ज्ञानेश्वर बावणे (22) याच्या नावेत ते बसले. जलाशयाच्या मधे गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात सर्व जण एकाच बाजूला जमले. परिणामी नावेचे संतुलन बिघडले आणि नाव उलटली. अतुल बावणे याला पोहता येत होते. अन्य कुणालाही पोहता येत नसल्याने अतुल वगळता इतर 10 जण जलाशयात बुडाले.>शोधकार्य सुरू अतुल काठावर आल्यानंतर त्याने इतरांना नाव उलटून तरुण बुडाल्याची माहिती दिली. अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता. तरीही पोलीस आणि प्रशासनाच्या ताफ्याकडून रात्रीपासून शोधकार्य सुरू आहे.
वेणा जलाशयात नाव उलटून 7 तरुण बुडाले
By admin | Published: July 10, 2017 6:49 AM