शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

महिला प्रवाशांसाठी ७० बस

By admin | Published: March 07, 2017 12:55 AM

पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिलांची लवकरच सुटका होणार आहे.

पुणे : नोकरी-व्यवसायासाठी बसने प्रवास करणाऱ्या महिलांची वाढती संख्या आणि अपुऱ्या बसेसमुळे होणाऱ्या त्रासापासून पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिलांची लवकरच सुटका होणार आहे. राज्य सरकारने खास महिलांसाठी तेजस्विनी बस सेवेअंतर्गत पुण्याला ७० बस देण्याला हिरवा कंदील दिला आहे. राज्य सरकारकडून या बसेसचा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, लवकरच बस खरेदीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्या वेळी पुण्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जानेवारी महिन्यात या सेवेसाठी पुण्याचाही समावेश करण्यात आला. या शहरांसाठी प्रत्येकी ५० बस राज्य सरकारच्या वतीने खरेदी करण्यात येणार आहेत. महिलांची सुरक्षितता व सुखद प्रवासासाठी सरकारकडून खास महिलांसाठी तेजस्विनी सेवा सुरू करण्यासाठी सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. संबंधित पालिका किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनाने बस खरेदी व संचलनाची प्रक्रिया राबवायची आहे.या बसेसबाबत राज्य सरकारने संबंधित शहरांतील सार्वजनिक वाहतूक संस्थेकडून अहवाल मागविले होते. ‘पीएमपी’ने या अहवालामध्ये तेजस्विनी सेवेसाठी १०० मिनी बसेसची मागणी केली होती. मात्र, राज्य सरकारकडून सुरुवातीला ५० बसेस देण्याचेच मान्य करण्यात आले होते. ‘पीएमपी’तील अधिकाऱ्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांची संख्येच्या आधारे अधिकच्या बसेसची गरज पटवून दिली. त्यामुळे ७० बसेस देण्याला सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. ‘पीएमपी’चे सहव्यवस्थापकीय संचालक डी. पी. मोरे यांनीही याला दुजोरा दिला आहे. ‘राज्य सरकारकडे १०० बसेसची मागणी करण्यात आली होती. मात्र, ७० बसेसला मान्यता मिळाल्याचे समजले आहे. अद्याप अधिकृत पत्र आलेले नाही. हे पत्र मिळाल्यानंतर बस खरेदीची प्रक्रिया सुरू होईल,’ असे मोरे यांनी सांगितले.>राज्य सरकारतर्फे महिलांसाठी पाच महापालिकेत तेजस्विनी सेवाराज्य सरकारने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर या पाच महानगरपालिका क्षेत्रांमध्ये खास महिला प्रवाशांसाठी तेजस्विनी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पुण्याचा त्यामध्ये समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर जानेवारी महिन्यात पुण्याचाही समावेश करण्यात आला. >या बस प्रामुख्याने पुणे स्टेशन, स्वारगेट, मनपा, हडपसर या प्रमुख स्थानकातून सोडण्याचे प्रस्तावित आहे. माळवाडी, धायरी, वाघोली, कोथरूड डेपो, निगडी, भोसरी, चिंचवडगाव, हिंजवडी, विश्रांतवाडी यांसह अन्य काही मार्गांवर बस सुरू केल्या जातील. या मार्गांवरील गर्दीच्या वेळा निश्चित करून त्यानुसार बसेसची वारंवारता ठरविली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.>२० ते २५ मार्गांवर धावेल तेजस्विनी‘पीएमपी’कडून सध्या खास महिलांसाठी चार ते पाच मार्गांवर गर्दीच्या वेळी बस सोडल्या जातात. शिवाजीनगर ते कात्रज, कात्रज ते हौसिंग बोर्ड, स्वारगेट ते हडपसर आणि हडपसर ते मनपा या मार्गावर सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी बस सोडली जाते. काही वर्षांपूर्वी केवळ महिलांसाठीच काही मार्गांवर दिवसभर बसच्या फेऱ्या सुरू असायच्या. मात्र, महिलांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा केवळ गर्दीच्या वेळी सुरू ठेवण्यात आली. आता राज्य शासनाकडून ७० बस मिळणार असल्याने महिलांसाठी अधिक बस उपलब्ध होणार आहेत. या बस पुणे व पिंपरी चिंचवडमधील २० ते २५ मार्गांवर सुरू करण्याचे नियोजन आहे. >तेजस्विनी बस सकाळी ७ ते ११ तसेच सायंकाळी ५ ते रात्री ९ या कालावधीत गर्दीच्या वेळी सोडल्या जातील. या बसेसमधील सर्व आसने महिलांसाठीच राखीव असतील. सुरक्षेच्यादृष्टीने बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही असणे बंधनकारक आहे.बसेसमध्ये प्रामुख्याने महिला चालक व वाहक असतील. स्थानिक परिस्थितीनुसार तिकीटदर व वेळा ठरविण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे.>राज्य सरकारकडे १०० बसेसची मागणी करण्यात आली होती.>70बसेसला मान्यताराज्य सरकारकडून या बसेससाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.