अकोला : मध्यप्रदेशातील इंदूर येथून अकोल्यात आणले जाणारे ७0 लाखाचे सोने आणि चांदी खंडवा पोलिसांनी मंगळवारी जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. इंदूर-इच्छापूर महामार्गावर खंडवा पोलिसांनी संशयावरून एका कारची झडती घेतली. या कारमध्ये तीन जण होते. त्यापैकी दोन जण चालक होते. पोलिसांनी झडती घेतली असता, त्यांच्याकडे सोन्याची दोन बिस्किटं आणि चांदीच्या अनेक विटा आढळल्या. पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपींना समाधानकारक उत्तरं देता आली नाही. त्यामुळे सोने-चांदी जप्त करून, आरोपींना अटक करण्यात आली. जप्त केलेले सोने २.३८३ किलो, तर चांदी ३0 किलोग्रॅम आहे. मी सोनार असून, हे सोने-चांदी इंदूर येथील एका व्यापार्याकडून विकत घेतल्याचा दावा आरोपीने केला. व्यापार्याला पूर्ण रक्कम दिली नाही, त्यामुळे आपल्याकडे पावती नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. आरोपींची कारही पोलिसांनी जप्त केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
अकोल्यात येणारे ७0 लाखाचे सोने जप्त
By admin | Published: November 25, 2015 2:08 AM