शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सहा महिन्यांत ७0 बळी

By admin | Published: June 06, 2016 1:34 AM

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत

कमलाकर कांबळे,  नवी मुंबईमुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावर तब्बल १३0 अपघात झाले असून, त्यात ७0 जणांचे बळी गेले आहेत, तर जवळपास २५0 जण जखमी झाले आहेत. रविवारी शिवकर गावाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर या महामार्गावरील सुरक्षित प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांतील अंतर कमी करण्याच्या दृष्टीने मुंबई-पुणे दु्रतगती महामार्ग तयार करण्यात आला. २00२ मध्ये ९४.५ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे मुंबई ते पुणे हा १४८ किमी लांबीचा प्रवास ४-५ तासांवरून थेट दोन तासांवर आला. याचा परिणाम म्हणून मागील चौदा वर्षांत या महामार्गावरील वाहतूक वाढली. सुसाट व अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघातांची संख्याही वाढली. विशेष म्हणजे पहिल्या दहा वर्षांत म्हणजे २00२ ते २0१२ या कालावधीत या महामार्गावर लहान-मोठे तब्बल १७५८ अपघात घडले होते. दिवसाआड होणाऱ्या अपघातांमुळे हा महामार्ग असुरक्षित बनला आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या सत्तरच्या घरात गेली आहे, तर जवळपास अडीचशे जण कायमचे जायबंदी झाले आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातांतील मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महिंद्रा आणि महिंद्रा लि. तसेच सेव्ह लाइफ फाउंडेशन यांच्यात फेब्रुवारी २0१६ मध्ये सामंजस्य करार झाला होता. एकत्रित सहकार्यातून पुढील तीन-चार वर्षांत महामार्गावरील अपघातांत मृतांची संख्या शून्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु सहा महिन्यांत या महामार्गावरील अपघातांची संख्या पाहता हे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे दिसून आले आहे.अपघातांचा तपशील२९ एप्रिल २0१६ : खोपोली एक्झिट वळणावर कंटेनरची मध्यरात्रीच्या सुमारास पिकअप व्हॅनला धडक, २ जण ठार१७ मार्च २0१६ : महामार्गावरील अडोशीजवळ खासगी बसची दुभाजकाला धडक, २ ठार, १५ जण जखमी१६ मे २0१६ : भरधाव एसटी बसची झाडाला धडक. दुपारी पावणे तीनची घटना. १५ प्रवासी जखमी२ जून २0१६ : भरधाव कारची रस्ता दुभाजकाला धडक, ३ ठार, तीन जखमी. अपघातग्रस्त एकाच कुटुंबातील ठाणे येथील रहिवासी होते.२ जून २0१६ : खासगी लक्झरी बसची ट्रकला धडक, पहाटे घडलेल्या या अपघातात ५ ठार, १६ जखमी५ जून २0१६ : महामार्गावरील शिवकर गावाजवळ लक्झरी बसची स्विफ्ट आणि इनोव्हा गाडीला धडक, १७ मृत, ४७ जखमी.