पुणे : कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवर काम करीत असून अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्राप्त अर्जांपैकी ७० टक्के अर्जांची पडताळणी झाली असूनदहापेक्षा अधिक जिल्ह्यांमधील माहिती आॅनलाइन अपलोड करण्यात आल्याची माहिती, सहकार आयुक्त विजयकुमार झाडे यांनी दिली. कर्जमाफीसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राज्य सरकारने जाहीर केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ५६ लाख ५९ हजार शेतकºयांचे अर्ज आले आहेत. त्यापैकी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक अर्जांची आॅनलाइन पडताळणी झाली आहे. माहिती अपलोड करताना जिल्हा बँका, व्यावसायिक बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना येणाºया अडचणी सोडवण्यासाठी गुरुवारी बैठक झाली. आता तांत्रिक कामात सुधारणा झाल्याचेही झाडे यांनी सांगितले.सहकार विभागाचे लेखापरीक्षक याद्यांची पडताळणी करुन कर्जमाफीस पात्र, अपात्र ठरणाºया शेतकºयांच्या याद्या तयार करीत आहेत. त्याची पडताळणी करुन आयटी विभाग हिरवी यादी जाहीर करणार आहे. त्यानंतर तालुकास्तरीय समितीकडून आक्षेप तपासून अंतिम यादी जाहीर होईल. त्यानंतर बँका त्या यादीनुसार शेतकºयांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे देतील, असेही त्यांनी सांगितले.
कर्जमाफीसाठी ७० टक्के अर्जांची पडताळणी ; सहकार विभागात युद्धपातळीवर कामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 3:53 AM