शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
2
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
3
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
4
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
5
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
6
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
7
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
8
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
9
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
10
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
11
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
12
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
14
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
15
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
16
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
17
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
18
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
19
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
20
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं

राज्यात ७० हजार नोकऱ्या, ८ हजार कोटींची गुंतवणूक !

By admin | Published: July 11, 2015 3:04 AM

अमेरिकेतल्या गुगलने एका देशात त्यांच्या कंपनीसाठी सादरीकरण केले, त्याच ठिकाणी चायनाचे शिष्ठमंडळ चायनाला रिप्रेझेंट करीत होते आणि या दोन्ही देशांच्या १५ जणांच्या

दिनकर रायकर, मुंबईअमेरिकेतल्या गुगलने एका देशात त्यांच्या कंपनीसाठी सादरीकरण केले, त्याच ठिकाणी चायनाचे शिष्ठमंडळ चायनाला रिप्रेझेंट करीत होते आणि या दोन्ही देशांच्या १५ जणांच्या शिष्ठमंडळात १३ भारतीय होते! त्यातही मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रीयन होते!! ही अभिमानाची बाब आहे आणि नेमका तोच अभिमान ‘कॅश’ करण्यासाठीची मी केलेली अमेरिकावारी यशस्वी ठरली. या दौऱ्यात आम्ही ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीची आणि ७० हजार नोकऱ्यांची ‘कमिटमेंट’देखील मिळवली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यानंतर प्रथमच ‘लोकमत’शी बोलत होते. या दौऱ्यामागचा उद्देश आणि त्यातून मिळालेले यश सांगताना त्यांनी अनेक अनुभवही सांगितले. त्यांची ही मुलाखत खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी -प्रश्न : गेल्या आठ महिन्यांत तुम्ही अनेक देशांच्या दौऱ्यावर गेलात. यामागे नेमका हेतू काय होता? राज्यापुढे अनेक प्रश्न पडून असताना तुम्ही गेलात, अशी टीकाही होते आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताविषयी खूप मोठे उत्सुकतेचे वातावरण निर्माण केले आहे. भारतात गुंतवणूक करण्यास अनेक चांगल्या संधी आहेत, हे त्यांनी त्यांच्या जगभरात केलेल्या दौऱ्यांमधून सांगितले आणि त्याचा सकारात्मक परिणाम झाला. देशविदेशातील उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा निर्माण झाली. त्यांनी भारतात येताना महाराष्ट्राची निवड करावी, यासाठी मी महाराष्ट्राचे ब्रँडिंग करण्याकरिता हा दौरा केला आणि त्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झालोय.प्रश्न : राज्यात परदेशी गुंतवणूकदारांनी यावे, यासाठी आपण कोणते प्रयत्न केले? त्यामागची आपली भूमिका कोणती आहे?११ कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या राज्यात वय वर्षे २५च्या आतले ५ कोटी युवक आहेत, जे टेक्नोसॅव्ही आहेत. शेती त्यांच्यासाठी रोजगाराचे साधन होऊ शकत नाही. त्यांना व्हॅल्यू अ‍ॅडेड काम हवे आहे आणि हे तरुण शेतीकडे वळतील असे चित्र नाही. त्यामुळे या तरुणांच्या हाताला काम मिळायला हवे, ही माझी भूमिका आहे. त्यासाठीच मग परदेशी गुंतवणुकीचा मार्ग आम्हाला योग्य वाटला. या अशा गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. या अमेरिका दौऱ्यात आम्ही केलेल्या एमओयूमुळे किमान ७० हजार तरुणांना काम मिळेल, याची मला खात्री आहे.प्रश्न : कोणकोणत्या कंपन्यांनी गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली?एकट्या ब्लॅकस्टोन कंपनीने आमच्याशी ४,५०० हजार कोटींचा सामंजस्य करार केला आहे. पुणे आणि मुंबईतील आयटी पार्क मध्ये १,०५० कोटी आणि ईआॅन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटींची गुंतवणूक करण्यास आम्ही त्यांना तयार केले आहे. कोकाकोला लोटे परशुराम येथे (चिपळूण) ५०० कोटीची गुंतवणूक करणार आहे. तर सिटी बँकेचे प्रबंध संचालक जगदीश राव हे ४ हजार तरुणांना रोजगार मिळेल असा बँकेचा विस्तार राज्यात करणार आहेत. क्रिसलरने रांजणगाव येथील प्रकल्पाची उत्पादन क्षमता दुप्पट करुन २०१८ पर्यंत २ लाख ४५ हजार वाहनांची निर्मीती करण्याचे ठरवले आहे. जनरल मोटर्स देखील मोठी गुंतवणूक करणार आहे. देशभरात डिजिटल इंडिया सप्ताहास प्रारंभ झाला असतानाच महाराष्ट्र अधिक स्मार्ट करण्याच्या दृष्टिकोनातून नागपूर शहर अधिक सुरक्षित आणि स्मार्ट करण्यासाठी राज्य सरकारने सिस्को या नेटवर्किंग क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीसोबत सॅन फ्रान्सिस्को येथे सामंजस्य करार केला. प्रश्न : तुमच्या दौऱ्यात सायबर क्राईमच्या अनुषंगाने काही चर्चा झाली का?येणाऱ्या काळात सगळ्यात सायबर गुन्हे हे मोठे गुन्हे ठरणार आहेत. रस्त्यावरच्या गुन्ह्णांपेक्षा ‘व्हाईट कॉलर’ क्राईम वाढेल. आजच जगभरात किमान ४० लाख सायबर हल्ले होत असल्याची आकडेवारी आहे. येणाऱ्या १० वर्षात आपल्या राज्यातही सायबर गुन्हे वाढीस लागतील. त्याची तयारी केली नाही आणि आमच्या पोलीस दलाला आत्तापासून त्यात सतर्क केले नाही तर परिस्थिती बिकट होईल. म्हणूनच आम्ही अशा गुन्ह्णांना रोखण्यासाठीची पावले टाकत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट या समुहाने राज्यात एक स्मार्ट औद्योगिक वसाहत तसेच पुणे येथे सायबर सुरक्षा केंद्र उभारण्याचे आश्वासन आपल्याला दिले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल व्हिलेज या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही कंपनीने मान्य केले आहे. कंपनीने पथदर्शी प्रकल्प म्हणून मेळघाट येथील एक आदिवासी खेडे दत्तक घेऊन ‘टर्शरी केअर’ अंतर्गत रुग्णसेवा देण्याचे मान्य केले आहे.प्रश्न : नागपूरच्या मिहानमधील बोर्इंग कंपनीने आपला व्यवसाय बंद करु नये यासाठी आपण काही प्रयत्न केले आहेत का?बोर्इंगने ‘मेन्टेनन्स, रिपेअर्स आणि आॅपरेशन’ एमआरओचे मिहानमधील काम सुरु केले होते. मात्र त्यांना त्यात काही अडचणी आल्या. त्यामुळे ते काम एअर इंडियाने घेतले असले तरी त्याचे मार्केटींग बोर्इंग करेल आणि या बाबतीत त्यांचे सिंगापूर एअरलाईन्सशी बोलणे सुरु आहे. इतरही एअरलाईन्सला त्यात सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. शिवाय त्यांना लागणाऱ्या प्रशिक्षीत मनुष्यबळासाठी प्रशिक्षण वर्ग देखील नागपूरलाच सुरु करणार आहेत. त्यासाठीचे कोर्सेस देखील त्यांनी तयार करणे सुरु केले आहे. शिवाय बोर्इंगला लागणारे स्पेअर पार्टस् देखील ते भारतातून खरेदी करणार आहेत.-------------मेक इन इंडिया या देशातील महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत ‘मेक इन महाराष्ट्र’ आवश्यक आहे़ कारण महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे, असे पटवून देण्यात आपण यशस्वी झालो आहोत. मेक इन महाराष्ट्र हा आमचा केवळ नारा नाही, तर व्यापक लोकचळवळ आहे. इथल्या तरुणांना योग्य शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार देण्याची गरज आहे़ ते देण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. च्राज्याच्या प्रशासनात आमूलाग्र परिवर्तन होत असून, रेड टेपऐवजी रेड कार्पेट संस्कृती आम्ही प्रस्थापित करीत आहोत. औद्योगिक क्षेत्रातील परवानाराज आम्ही संपुष्टात आणले आहे. या गोष्टी तेथे अनेकांना आवडल्या.-------------अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना काय फरक जाणवला, तिथले वातावरण कसे होते?अमेरिकतसुद्धा भारताविषयी उत्सुकता आहे. भारतात विकासाचा दर चांगला आहे. एकाच पक्षाचे मजबूत सरकार आहे. त्यामुळे तेथील भारतीय आणि विशेषत: महाराष्ट्रीयन लोकांना येथे प्रगती व्हावी असे वाटत असते. त्यांच्या याच भावनांचा मी राज्यासाठी फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच अमेरिकन कंपन्यांच्या वरिष्ठ पदांवर महाराष्ट्रीयन आहेत. आमच्या या प्रयत्नांना त्यांचा पाठिंबाही आहे. आम्ही केलेल्या एमओयूचा पाठपुरावा भारतीय दूतावासातर्फे केला जाईलच; पण आम्ही ज्यांना भेटलो तेदेखील आता महाराष्ट्राचे ब्रँड अ‍ॅम्बॅसडर बनले आहेत.-----------------