शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

दररोज ७० हजार लीटर मोफत पाणी...

By admin | Published: April 27, 2016 3:44 AM

कौसा परिसरात सध्या पाणीटंचाईवर विविध प्रकारचे राजकारण सुरू आहे.

कुमार बडदे, मुंब्रामुंब्रा-कौसा परिसरात सध्या पाणीटंचाईवर विविध प्रकारचे राजकारण सुरू आहे. यासाठी उपोषण, घेराव, मोर्चे आदी प्रकार मागील काही दिवसांपासून येथे सातत्याने सुरू आहेत. याच वेळी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता एका खाजगी जागेवर बोअरवेल खोदून त्यातून दररोज तब्बल ७० हजार लीटर पाण्याचे मोफत वाटप करण्यात येत असल्याची सुखद घटना समोर आली आहे. येथील प्रभाग क्र मांक ६३ मधील कौसा भागातील चर्णीपाडा परिसरातील फारूक ढोले यांनी त्यांच्या खाजगी जागेवर स्वखर्चाने बोअरवेल खोदली. त्यामधून तेथील सैनिकनगर,चर्णीपाडा, मोतीबाग, रशीद कम्पाउंड आदी परिसरांतील २०० कुटुंबांना दररोज सरासरी ३५० लीटर याप्रमाणे ७० हजार लीटर मोफत पाण्याचे वाटप करण्यात येत आहे. बोअरवेलमधून पाणी खेचण्यासाठी मोटारसाठी लागणारा विजेचा खर्चदेखील पाणीवाटपाचे संचलन करणारे मोहरम कमिटीचे सदस्य करत असल्याची माहिती अली पटणी या कमिटी सदस्याने दिली. पाणीकपातीच्या अडीच दिवसांमध्ये मुंब्रा-कौसा भागातील अनेक भागांतील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकतात. परंतु, या बोअरवेलमुळे पाणीकपातीच्या दिवसांमध्येदेखील या भागातील नागरिकांना पर्याप्त प्रमाणात पाणी मिळते, असे त्यांनी सांगितले.