मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबईत मागील चोवीस तासांत अवघे एक हजार ७१७ रुग्णांचे निदान झाले असून, ५१ मृत्यूंची नोंद झाली आहे तर त्या तुलनेत मंगळवारी बरे झालेल्या संख्या अधिक असून, तब्बल सहा हजार ८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहर उपनगरात आतापर्यंत एकूण सहा लाख २३ हजार ८० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.मुंबईत सध्या ४१ हजार १०२ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९२ टक्के असून, रुग्ण दुप्पट होण्याचा काळ १७० दिवसांवर येऊन ठेपला आहे. ४ ते १० मे या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.३९ टक्के असल्याची नोंद आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा लाख ७९ हजार ९८६ असून, बळींचा आकडा १३ हजार ९४२ इतका आहे. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी दिवसभरात २८ हजार २५८ चाचण्या करण्यात आल्या, तर आतापर्यंत एकूण ५७ लाख ६१ हजार ६८९ कोरोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
आतापर्यंत राज्यात १ कोटी ८४ लाखांहून अधिक जणांना लसराज्यात सोमवारी २ लाख ९४ हजार ७६ लाभार्थ्यांना लस देण्यात आली, तर आतापर्यंत एकूण १ कोटी ८४ लाख ७ हजार ४६५ जणांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली.- राज्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक २७ लाख ८२ हजार ६४७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्याखालोखाल, पुण्यात २४ लाख ८७ हजार ६४४, नागपूर ११ लाख १९ हजार ८१२ , ठाणे १४ लाख २३ हजार ४००, तर नाशिकमध्ये ८ लाख ३४ हजार ८१ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्तराज्यात मागील २४ तासांत रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.राज्यात दिवसभरात ४० हजार ९५६ रुग्ण आणि ७९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली असून बळींचा आकडा ७७ हजार १९१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.दिवसभरात नोंद झालेल्या ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.